जळगाव ः जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) शिवसेना भाजपला एकामागून एक धक्के देण्याच्या पवित्र्यात आहे. महापौर (Mayor) निवडीच्या वेळी २७ नगरसेवक फोडल्यानंतर गेल्या आठवड्यात तीन नगरसेवकांनी (corporators) सेनेत प्रवेश केला. आता आणखी १२ नगरसेवक वेटिंगवर असून त्यांचाही लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत (Mumbai) या नगरसेवकांची चाचपणी केली जात असून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
(jalgaon municipal corporation bjp corporators leave the party preparing)
२०१८ च्या जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ५७ नगरसेवक निवडून आणत जनतेने भाजपला एकहाती सत्ता सोपवली होती. अडीच वर्षे भाजपची सत्ता राहिल्यानंतर मार्च मध्ये भाजपमधील २७ नगरसेवकांचा मोठा गट फुटला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढून शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर तर भाजपच्या बंडखोर नगरसेवकांमधून उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली.
दुसरा धक्का
पूर्ण बहुमतातील भाजपची सत्ता खेचून आणल्यानंतर शिवसेनेने भाजपला गेल्या आठवड्यात दुसरा झटका दिला. २९ मेस आणखी तीन नगरसेवकांनी भाजपत प्रवेश करून पुन्हा हादरा दिला. आता पुन्हा १२ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. या नगरसेवकांची चाचपणी सुरु असून काही दिवसांत ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश करतील, असे दिसते.
खासदार राऊत करणार चाचपणी
या बारा नगरसेवकांपैकी तीन-चार नगरसेवक हे घरकुल घोटाळ्यातील आहे. त्यामुळे या नगरसेवकांना शिवसेनेत अडचणी येवू शकतात का याबाबत चाचपणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत करणार आहे. यासाठी शिवसेनेचे नगरसेवकांना तातडीने मुंबईला बोलविण्यात आले असून याबाबत आज खासदार राऊत हे नगरसेवकांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहे.
भाजपला पुन्हा झटका बसणार का ?
महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ३० नगसेवकांनी आतापर्यंत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उरलेल्या २७ नगसवकांपैकी आता १२ नगरसेवक देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याने भाजपची संख्याबळ अतिशय कमी होणार आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.