जळगाव मनपाः ‘सत्तातुरानाणां ना भयं ना लज्जा..’

वर्षभरात शहराचा कायापालट करण्याचा नेत्यांचा शब्द नंतरच्या अडीच वर्षांत जळगावच्याच रस्त्यांवरील खड्ड्यांत हरवला.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation
Updated on


जळगावः महापौर (Mayor) निवडीच्या वेळी सुनील महाजनांना जे काही साधायचं ते त्यांनी साधून घेतलं.. भाजपच्या (BJP) फुटीर नगरसेवकांनीही (Corporator) जो काय संधिसाधूपणा साधायचा तो आर्थिक स्वार्थाद्वारे साधून घेतला.. त्यामुळे आता हे फुटीर पुन्हा भाजपवासी झाले असतील आणि आणखी काहींची घरवापसी होणार असेल तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखं काही नाही. जनहित आणि शहर विकासाला विकून खाणाऱ्यांकडून वेगळी अपेक्षा करणं मूर्खपणाचं.. ‘सत्तातुरानाणां ना भयं ना लज्जा’ हे संस्कृत संबोधन जळगावच्या माथी बसलेल्या नगरसेवकांना चपखल लागू होते.

Jalgaon Municipal Corporation
जिल्हा बँक निवडणूक: भाजप स्वतंत्र लढणार- गिरीश महाजन


सन २०१८मध्ये झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपत जोरदार ‘इनकमिंग’ झालं.. इनकमिंग आणि सत्तेच्या बळावर भाजपने निर्भेळ यश संपादन करत महापालिका ऐतिहासिकरित्या ताब्यात घेतली. वर्षभरात शहराचा कायापालट करण्याचा नेत्यांचा शब्द नंतरच्या अडीच वर्षांत जळगावच्याच रस्त्यांवरील खड्ड्यांत हरवला.. भाजपच्या मनपातील सत्तेची अडीच वर्षे नेतृत्वाच्या उदासीनतेसह कोविडमुळे वांझोटी ठरली.


यादरम्यान राज्यात सत्ताबदल झाल्याने महापालिकेत वर्चस्व गमावलेल्या शिवसेना नेतृत्वाने महापौर निवडीच्या निमित्ताने सत्तेचं स्वप्न पाहिलं आणि भाजपतील २७ व एमआयएमचे ३ असे ३० नगरसेवकांना गळाला लावत, हे स्वप्न मोठी रक्कम मोजून प्रत्यक्षात साकारलं. जयश्री महाजन महापौर झाल्यात, तरीही पती सुनील महाजनांना विरोधी पक्षनेतेपद काही सोडवलं नाही.. मनपाच्या सत्तेतील ड्राम्याचा मार्चमध्ये महापौर निवडीचा दुसरा अंक संपला. आता गेल्या आठवड्यात फुटीर नगरसेवकांपैकी १३ पुन्हा भाजपत परतले. हा होता, ड्राम्यातील तिसरा अंक. आणखी काही फुटीर भाजपच्या वाटेवर आहेत म्हणे..

Jalgaon Municipal Corporation
धरणगाव नगरपालिकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार


हे अंक पार पडताना पक्ष, नेत्याशी निष्ठा, शहराच्या विकासाशी बांधीलकी या शब्दांची ओळख नसलेल्या नगरसेवकांना त्याबाबत काय विचारणार? निवडणुकीच्या वेळी भाजपने जे ‘इनकमिंग’चं बीज पेरलं, नंतर तेच उगवलं.. आता घरवापसी होऊनही ही मंडळी भाजपच्या तंबूत किती दिवस राहते? हा प्रश्‍नच आहे. ठराविक रकमेपोटी इमान विकणाऱ्या आणि ते खरेदी करणाऱ्यांनाही काहीच लाज वाटू नये, हे जळगावसारख्या शहरात आश्‍चर्य वाटण्यासारखे नाही.
भाजपतून फुटून सेनेची छावणी गाठताना आमदारावर आगपाखड करणं, आणि आता भ्रमनिरास झाला म्हणून त्याच आमदाराकडून स्वागत करून घेणं.. हे सारं अनाकलनीय. ही सर्व प्रक्रिया शहराच्या विकासाच्या दृष्टीने वांझोटीच. सत्तेसाठी भय आणि लज्जा गहाण ठेवणाऱ्या या मंडळींना बंडखोरही कसं म्हणायचं? बंड अन्यायाच्या विरोधात, क्रांतीसाठी केलं जातं. स्वार्थासाठी पक्ष बदलणारे हे बंडखोर नाहीच.. यांना तर फुटीर, गद्दार म्हणणेही कमीच.. काही नगरसेवक आपापल्या भागासाठी प्रामाणिकपणे काम करतांय, त्यांना सत्ता अथवा कुठल्या पक्षाच्या लेबलचीही गरज पडत नाही. मात्र, बहुतांश सदस्य ‘मॅनेज’ आहेत, हे वास्तव लपून राहणारे नाही. अशा घटनांमधून खरेतर राजकीय पक्षांनी आणि मुख्य म्हणजे जळगावकरांनी धडा घेणे गरजेचे. हा धडा घेऊन अशा लोकांना जळगावकर कायमचा धडा शिकवतील, तो खरा सोनियाचा दिनू असेल.. अन्यथा, तेच रस्ते, तेच खड्डे, तीच अस्वच्छता, तीच रोगराई.. त्याच नरकयातना..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()