जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

महासभेस उपस्थित राहण्यासह भाजप उमेदवारांना मतदान करण्यासंबंधी सर्वांना व्हीप बजावला होता
जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस
Updated on


जळगाव : मार्च महिन्यात झालेल्या महापौर (Mayor) निवडीवेळी भारतीय जनता पक्षाचा (BJP) व्हीप झुगारत शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारास मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना (corporators) नाशिक विभागीय आयुक्त (Nashik Divisional Commissioner) कार्यालयाकडून अपात्रतेसाबत नोटीस बजावली (Ineligible notice) आहे. त्यांच्याकडून सात दिवसांत उत्तर मागविले असून, जिल्हाधिकारी (Collector) व महापालिका आयुक्तांनाही (Commissioner) त्यांचे म्हणणे सादर करण्यासंबंधी आदेशित केले आहे. (jalgaon municipal corporation twenty seven corporators ineligible notice)

जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस
मंत्रिपदाचा राजीनामा..पक्षत्याग..‘ईडी’ची चौकशी


५७ नगरसेवकांसह जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) पूर्ण बहुमतात असलेल्या भाजपतील २७ नगरसेवकांनी मार्च महिन्यात झालेल्या महापौर निवडीवेळी फुटून वेगळा गट स्थापन केला. भाजपचे तत्कालीन गटनेते भगत बालाणी यांनी नगरसेवक फुटल्यानंतर महापौर निवडीसंदर्भात झालेल्या महासभेस उपस्थित राहण्यासह भाजप उमेदवारांना मतदान करण्यासंबंधी सर्वांना व्हीप बजावला होता. मात्र, त्याचे उल्लंघन करून या नगरसेवकांना शिवसेना उमेदवार जयश्री महाजन यांना मतदान होते.

अपात्रतेबाबत तक्रार
या घडामोडी घडल्यानंतर गटनेते भगत बालाणी व नाशिक मनपातील भाजप सदस्य जगदीश पाटील यांनी संयुक्तपणे बंडखोर नगरसेवकांना अपात्र करावे, अशी तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली होती. ही तक्रार दाखल करताना भाजपने प्रत्येक सदस्याच्या स्वतंत्र तक्रारीसोबत दस्तावेजांचा मोठा संचही सादर केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आणखी काही कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत सूचित केल्यानंतर त्याची पूर्तताही जूनअखेर करण्यात आली.

जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस
जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्यात


२७ जणांना नोटीस
या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयाने आता भाजपतून फुटून व्हीप झुगारणाऱ्या २७ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर मागवले असून, ते सादर न केल्यास अपात्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या नगरसेवकांसोबतच महापौर निवडीच्या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी यांनाही नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून या घडामोडींबाबत स्पष्टीकरण मागविले आहे.

...असे आहेत नगरसेवक
प्रिया जोहरे, सरिता नेरकर, ॲड. दिलीप पोकळे, रुकसानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रवीण कोल्हे, चेतन सनकत, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिभा देशमुख, कुलभूषण पाटील, पार्वताबाई भिल, सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे, ज्योती चव्हाण, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, मनोज आहुजा, मीनाक्षी पाटील, सुनील खडके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.