राणेंची तर..हऱ्या,नाऱ्याची गँग होती;मंत्री गुलाबरावांचा सणसणीत टोला

आपला वाळूचा धंदा असल्याचा आरोप त्यांनी केला, तो साफ चुकीचा आहे.
राणेंची तर..हऱ्या,नाऱ्याची गँग होती;मंत्री गुलाबरावांचा सणसणीत टोला
Updated on

जळगाव : भाजपचे निलेश राणे (BJP MP Nilesh Rane) यांनी आपला वाळूचा धंदा (sand) असल्याचा आरोप खोटा केला आहे. परंतू नीलेश राणे यांचे वडील नारायण राणे (Narayan Rane) यांची तर हाऱ्या, नाऱ्याची गँग होती. याची आपल्याला माहिती आहे, असा सणसणीत टोला शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी लगावला आहे.

(narayan ranes gang was the allegation of minister gulabrao patil)

राणेंची तर..हऱ्या,नाऱ्याची गँग होती;मंत्री गुलाबरावांचा सणसणीत टोला
संतापजनक घटना..कैऱ्या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार नीलेश राणे जळगाव येथे सोमवारी (ता. ७) आले होते. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी श्री. राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाळूचा धंदा असल्याचा आरोप केला.

मंत्री गुलाबराव पाटील यांना मंगळवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मंत्री पाटील म्हणाले, की मराठा आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, केवळ विरोधक म्हणून नीलेश राणे यांना सरकारविरोधात टीका करणे भाग आहे. आपला वाळूचा धंदा असल्याचा आरोप त्यांनी केला, तो साफ चुकीचा आहे. आपला वाळूचा धंदा असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे त्यांना आपले खुले आव्हान आहे. आपला वाळूचा धंदा नाही. मात्र, नीलेश राणे यांच्या वडिलांची हऱ्या- नाऱ्याची गँग होती, याची आपल्याला चांगली माहिती आहे

राणेंची तर..हऱ्या,नाऱ्याची गँग होती;मंत्री गुलाबरावांचा सणसणीत टोला
बैलजोडी चोरल्याचा आरोपावरून साक्री पं. स. सदस्याची धिंड !

गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कार्यालयास केलेल्या टाळा ठोको आंदोलनाचे समर्थन केले. शिवसैनिक आहे त्याला जेथे अन्याय दिसेल तेथे त्याविरुद्ध तो आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.