जळगाव : भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात (Accident) कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.८) पहाटे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) नशिराबाद गावाजवळ घडली. कारमधील मृतांपैकी एकाच्या भावी पत्नी व सासूबाईंना साकेगाव येथे सोडून मुंबईच्या (Mumbai) दिशेने माघारी निघाले असतानाच हा अपघात घडला. अभिजित सुभाष पसारे (वय ३०, रा. डोंबिवली, ता. जि. ठाणे) आणि पवन नंदू बागूल (२७, रा. मानपाडा, ठाणे) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
(nasirabad village near highway car accident two youths death)
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित आणि त्याच्यासोबत कारमध्ये असलेला त्याचा मित्र पवन असे दोघे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. अभिजित यांचा नुकताच साकेगाव (ता. भुसावळ) येथील तरुणीसोबत साखरपुडा झाला होता. अभिजित यांचे होणारे सासरे आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले होते. त्यांच्याजवळ मुंबईत भावी पत्नी व सासू अशा दोघीही आल्या होत्या. आजारी वडिलांचे उपचार व्यवस्थित सुरू असल्याने भावी पत्नी व सासूबाईने परत आपल्या घरी साकेगावला जाण्याचे ठरवले. त्यानुसार अभिजित यांनी दोघींना सोडण्यासाठी भाड्याने कार (एमएच ०४ केआर ०१९४) करून ७ जुलैला सायंकाळी साकेगावला सुखरूप पोचवले.
वळणाने केला घात
अभिजित व मित्र पवन दोघे रात्री साकेगाव येथे आराम करून पहाटे तीनला परतीच्या मार्गावर निघाले. कार नशिराबाद गाव सोडून जळगावच्या दिशेने येत असताना फोर्ड शोरूमजवळ असलेल्या वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. यात अभिजितचा जागीच, तर पवनचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नशिराबाद पोलिसांत अपघाताची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.