सात्री गावात अधिकाऱ्यांसह 'एनडीआरएफ' चे पथक दाखल

आरुषीला नदी काठावर आणीत गावकऱ्यांच्या मदतीने धाडस केले. तिला खाटेवर बसवून नदी ओलांडून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे म्हणून प्रयत्न केले.
NDRF squad
NDRF squad
Updated on

कळमसरे ता.अमळनेर : तालुक्यातील सात्री येथील 13 वर्षीय आरुषीची उपचाराविना मृत्यु झाल्याची घटना घडली. संतप्त ग्रामस्थानी (Village) उपचाराविना आरुषीने रसत्यातच दम तोडल्याने आरुषीचे शवविच्छेदन झालेले प्रेत प्रांत कार्यालयात आणले होते. याप्रसंगी शासनाचा (government) तीव्र निषेध करीत काल च्या घटनेने शासनाने दखल घेत आज सात्री येथे प्रांतआधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, पुनर्वासन् समिती अध्यक्ष महेंद्र बोरसे, वैद्यकीय पथक यांच्या सह 'एनडीआरएफ'चे पथक (NDRF squad) दाखल झाले आहे.

NDRF squad
हतनूरचे ४१ दरवाजे उघडले;८२ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

यावेळी गावात साथीच्या आजाराने ग्रासलेले रुग्णाना उपचार देण्यात आला. यावेळी डॉ. दिनेश पाटील डॉ. असलम ,डॉ. स्वप्निल एस देशमुख, आरोग्य सेवक दिपक पाटील , श्री. पगारे, यानी तपासणी करून औषध उपचार केले. याप्रसंगी गावातील जवळपास 260 लोकांच्या तपासणी करण्यात येऊन अजुन सायंकाळी उशीरापर्यंत तपासणी सुरु होती.आशावर्क,अंगणवाडी सेविका हे उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात या घटनेने सर्वत्र जनमन हळहळले आणि या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला. आरुषी सुरेश भिल (वय-वर्ष 13) दोन दिवसापासून तापाने फनफनत होती.बोरी नदीला पूर आल्याने साहजिकच तिला घेऊन तिचा कुटुंबाला नदी ओलांडून जाणे जीवावर बेतनार.बोरी नदीला जास्त पाणी असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही.अशातच अधिक ताप वाढल्याने नदी काठावर आणीत गावकऱ्यांच्या मदतीने धाडस केले. तिला खाटेवर बसवून नदी ओलांडून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे म्हणून प्रयत्न करीत असतानाच तिचा झटका तेथेच तिचा मृत्यू झाला.लेक वाचावी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून, चार-पाच जणांच्या साहायाने टायरच्या ट्यूब व खाटेचा आधाराने नदी पार करीत रुग्णालय गाठले.मात्र दुर्दैव !डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित केले.

NDRF squad
शहादा शहर-तालुक्याला मुसळधारेचा तडाखा; पिकांचे नुकसान

पुनर्वसनचे काम रखडलेले

सात्री हे निम्न तापी प्रकल्पात पुनर्वसित गाव आहे.आठ वर्षांपासून या गावाचे पुनवर्सनचे काम रखडलेल्या स्वरूपात आहे. गेल्या आठवड्यात अप्पर जिल्हाधिकारी,पुनर्वसन अधिकारी यांनी या गावास भेट दिली होती.प्रामुख्याने, येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी पुढील दूरदृष्टी चा प्रत्यय बोलून दाखवला होता. मात्र निर्गगठ्ठ प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही.

गाव सुविधापासुन वंचित

गेल्या तेवीस वर्षापासून पाडळसरे प्रकल्पाचे निधीवाचून काम होत नाही.यातच सात्री गावाची पिढ्यां-पिढ्या समस्या सूटत नाही.या गावाचे पुनर्वसन होईल तेव्हा मात्र या नदिवर पुलाचे काम होने अत्यावश्यक आहे.नको तिथे कोटयावधी रूपयांचा निधी खर्च होतो मात्र याठिकाणी लोकांचा जीव महत्वाचा नाही अशी परिस्थिती झाली आहे.

NDRF squad
चाळीसगाव पुराच्या कटू आठवणी..पुन्हा आठव्या दिवशी

लोकांचा कार्याला सलाम..

'आरुषी'चा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महापुराने वेढलेले नदीपात्र पार करण्याचे धाडस दाखविणारे लोकांचा जाहीर सन्मान झाला पाहिजे व मृत 'आरुषी' च्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे. गरज नाही त्या ठिकाणी नदीवर 3 ते 4 पूल बांधले जातात, जेथे गरज आहे तेथे दुर्लक्ष केले जाते. आता तरी लोकप्रतिनिधी व निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येईल का ? व या गावचे ग्रहण सुटणार का ? हा समाज मनाला पडलेला एक प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.