जळगावमध्ये नव्याने साकारतेय तीनशे बेडचे जम्बो कोविड सेंटर

एकाच छताखाली व्यवस्था असल्याने कमी मनुष्यबळात सर्व रुग्णांवर लक्ष ठेवता येईल.
covide center
covide centercovide center
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांना बेडही उपलब्ध होत नसल्याची स्थिती लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय परिसरात तीनशे बेडचे जम्बो कोविड सेंटर नव्याने साकारत आहे. या सेंटरचे काम पूर्णत्वास असून, आठवडाभरात ते सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

covide center
सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन..आणि थेट कॅनडातून रुग्णांना मिळाला प्राणवायू

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक तीव्र होत आहे. गेल्या दीड महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ११ हजारांनी वाढली. या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाणही पहिल्या लाटेपेक्षा अधिक आहे. त्या मुळे अशा रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासत आहे. मात्र, शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेत बेड कमी पडू लागले आहे.

जम्बो कोविड सेंटरची तयारी

दुसऱ्या लाटेत ही स्थिती निर्माण होऊ शकते, याचा अंदाज घेऊन डॉ. उल्हास पाटील यांनी स्वत:च गेल्या महिन्यात त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय परिसरात अशाप्रकारचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यादृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली.

covide center
नो टेंशन.. लॉकडाऊनमध्ये बँकेतील पैसेही मिळणार घरपोच

...अशी असेल व्यवस्था

रुग्णालय परिसरात होमिओपॅथी इमारतीच्या समोरील प्रांगणात हे सेंटर उभारले जात आहे. एकाच डोमखाली २५० ते ३०० बेडची व्यवस्था असेल. त्यापैकी ६०-७० ऑक्सिजन बेड असतील. ऑक्सिजन बेडची गरज आणखी भासल्यास ते वाढवता येतील. एकाच छताखाली व्यवस्था असल्याने कमी मनुष्यबळात सर्व रुग्णांवर लक्ष ठेवता येईल. शिवाय, याचठिकाणी रक्त तपासणी, सीटी स्कॅनचीही सुविधा असल्याने रुग्णांची फिरफिर होणार नाही.

सध्या ४५० बेड

पहिल्या लाटेतही डॉ. पाटील रुग्णालयाने जिल्ह्यातील रुग्णांची गरज भागवली होती. आता दुसऱ्या लाटेत सध्या ४५० बेड उपलब्ध असून, पैकी ४०० बेड ऑक्सिजनचे आहेत. याच ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट असून, त्याचीही कमतरता भासणार नाही. त्या मुळे नजीकच्या काळात रुग्ण वाढले तर डॉ. पाटील रुग्णालयात त्यांची व्यवस्था होऊ शकेल.

कोविडच्या या भयंकर महामारीत आमच्या रुग्णालयाने चांगली सेवा देऊन आदर्श निर्माण केला. सद्य:स्थितीत रुग्णांची गरज ओळखून जम्बो कोविड सेंटर उभारत आहोत. रुग्णांचा जीव वाचला पाहिजे ही भूमिका असून, रुग्णांनी लक्षणे जाणवताच चाचणी करून दाखल व्हावे.

-डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन

दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून, त्यादृष्टीने जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. लवकरच ते कार्यान्वित करून रुग्णसेवा सुरू करू.

- प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.