एटीएम फोडण्याचा प्रयत्‍न फसला; मशीनचे नुकसान

atm thief
atm thief sakal
Updated on

धानोरा (ता. चोपडा) : जळगाव रोडवरील ग्रामपंचायत (Gram panchayat) शॉपिंग कॉम्प्लेस मधील इंडिकॅश कंपनीचे एटीएम (indicash bank atm) फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न गुरुवारी (ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (indicash bank atm machine robbery tray late night)

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कडक लॉकडाऊन सुरू असून रात्री रस्ते निर्मनुष्य असतात. याचा फायदा उचलत काही अज्ञात दरोडेखोरांनी धानोरा येथील जळगाव रस्त्यावर असलेले इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोडण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. लोखंडी साहित्य वापरून त्यांनी एटीएम मशीनचे नुकसान केले आहे. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

atm thief
जयंत पाटीलांनी एकनाथ खडसेंची घेतली भेट..चर्चा मात्र गुलदस्त्यात !

पोलिसांनी गस्त वाढवावी

चोपडा तालुक्यातील धानोरा हे गाव मोठ्या बाजारपेठेचे असून या ठिकाणी यावल रस्त्यावर सेंट्रल बँक व जळगाव रस्त्यावर इंडीकॅश कंपनी चे एटीएम आहेत. मागे अनेक वेळेस या दोन्ही ठिकाणी धाडसी चोरी झालेली आहे. त्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.

दोन्ही एटीएमवर सुरक्षारक्षक नाही

बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्ग वरिल धानोरा या गावात एटीएम फोडण्याचे प्रकार नेहमी सुरूच असतात. अनेकदा एटीएम फोडून लाखो रुपये चोरून नेण्यास दरोडेखोरांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वारंवार या सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम वर वेधले जाते. त्यामुळे या दोन्ही एटीएमवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()