उमविच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन

वर्ल्ड सायंटिस्ट ॲन्ड युनिव्हर्सिटी रँकिंग- २०२१ जाहीर करण्यात आले आहे.
उमविच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन
Updated on



जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University) ३५ संशोधकांना (Researchers) जागतिक मानांकन (Global Rankings) मिळाले असून, यात प्रशाळातील प्राध्यापक (Professor)आणि संशोधक विद्यार्थ्यांचा (Researchers Student) समावेश आहे. वर्ल्ड सायंटिस्ट ॲन्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ (World Scientist and University Rankings) मध्ये एवढ्या मोठया प्रमाणावर यश मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. (north maharashtra university researchers thirty five global rankings)

उमविच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन
जूनअखेरीस सरासरीपेक्षा कमी पाऊस; तीन प्रकल्पांत ठणठणाट


अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स तथा ए.डी.सायंटिफिक इंडेक्स विश्लेषित केला आहे. जगभरातील १८१ देशांतील दहा हजार ६५५ विद्यापीठांतील पाच लाख ६५ हजार ५५३ संशोधकांतून करण्यात आलेल्या निवडीमधून वर्ल्ड सायंटिस्ट ॲन्ड युनिव्हर्सिटी रँकिंग- २०२१ जाहीर करण्यात आले आहे. उल्लेखनीय यशाबद्दल संशोधकांचे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी अभिनंदन केले.

यांचा आहे समावेश
विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था- प्रा. जे. बी. नाईक, प्रा. सत्येंद्र मिश्रा (निवृत्त), प्रा. चिंतामण आगे, प्रा. अजयगिरी गोस्वामी, प्रा. विकास पाटील लाइफ सायन्सेस प्रशाळा- प्रा. ए. बी. चौधरी, प्रा. अरुण इंगळे, प्रा. प्रवीण पुराणिक, प्रा. भूषण चौधरी, डॉ. सतीश पाटील. भौतिकशास्त्र प्रशाळा- प्रा. डी. एस. पाटील, प्रा. पी. जी. चव्हाण, प्रा. ए. एम. महाजन, प्रा. जयदीप साळी, प्रा. संजय घोष, प्रा. जसपाल बंगे, केमिकल सायन्सेस प्रशाळा- प्रा. विकास गिते, डॉ. दीपक दलाल, डॉ. अमूल बोरसे (निवृत्त), संगणकशास्त्र प्रशाळा- प्रा. सतीश कोल्हे, प्रा. राकेश रामटेके, डॉ. मनीष जोशी, पर्यावरणशास्त्र प्रशाळा-प्रा. पी. आर. पाटील (निवृत्त), शिक्षणशास्त्र प्रशाळा- डॉ. मनीषा इंदाणी.

उमविच्या ३५ संशोधकांना जागतिक मानांकन
सावधान..‘बीएसएनएल’च्‍या नावाने येवू शकतो फोन; एकाला साठ हजाराचा गंडा

संशोधक विद्यार्थी असे
भावना मोहिते, चिन्मय हाजरा, देबाविश कंडू. तत्कालीन संशोधक- जितेंद्र भोसले, बिपीन साळुंखे, केशरसिंग पाटील, राहुल साळुंखे, दत्ता ढाले, नरेंद्र मोकाशे आणि संदीप राजपूत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.