जळगावमध्ये ‘भाजप’चे चक्काजाम आंदोलन; घोषणांनी चौक दणाणला

आकाशवाणी चौकात खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले
BJP Movement
BJP MovementBJP Movement
Updated on


जळगाव ः ‘उठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो’, ओबीसी के सन्मान मे बीजेपी मैदान, भारत माता की जय, वंदे मातरम, ठाकरे सरकार करते काय ? खाली डोके वर पाय...’,आरक्षण आमच्या (OBC reservation) हक्कांचे नाही कोणाच्या बापाचे.. अशा घोषणांनी आकाशवाणी चौक दणाणला होता. निमित्त होते भाजपच्या (BJP) चक्काजाम आंदोलनाचे (Movement).

( obc reservation again jalgaon bjp movement)

स्थानीक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे टिकविण्यात राज्यातील महाविकास आघाडी शासन अपयशी ठरल्याने, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी भुमिका घेत भाजपने आज राज्यभर आंदोलन केले. जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले.

आकाशवाणी चौकात खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. जळगाव जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष जयेश भावसार, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, दीपक साखरे, जिल्हा महानगरचे प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी जिल्हा आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.

BJP Movement
शेवटी..कुटुंबाला मिळाला ५० लाखाचा धनादेश


राज्य सरकारने न्यायालयात स्थानीक स्वराज्य संस्थेतील ओबीसीं’च्या आरक्षणाबाबतचे कागदपत्रे वेळेवर सादर केली नाही. यामुळे न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. जोपर्यंत राज्य शासन सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करून ओबीसींना आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत आमचे आंदेालन सुरूच राहील.
खासदार रक्षा खडसे

BJP Movement
वरखेड्यात बिबट्याचे हल्ले सुरुच..शेतातून बकरी पळवली


प्रत्येक तालुक्यात आंदोलन झाले. जनतेसाठी आंदोलन. सर्व समाजासाठी हे आंदोलन आहे. पक्षाच्या भुमिकेनुसार या समाजाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही. ५२ टक्के नाही तर सर्व जनतेवर अन्याय करते आहे. यापुढे तीव्र आंदोलन करू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.