पाच मिनिटात कोरोनाचा रिपोर्ट अन्‌ कार्यालयात प्रवेश

पाच मिनीटात कोरोनाचा रिपोर्ट अन्‌ कार्यालयात प्रवेश; टोळी झाली सक्रिय
Duplicate corona negative report
Duplicate corona negative reportDuplicate corona negative report
Updated on

पाचोरा (जळगाव) : दुय्यम निबंधक कार्यालयात (Office of the Deputy Registrar pachora) खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना कोरोना विषयक अँटीजन रिपोर्ट (Corona Antigen report) अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी या कार्यालय परिसरात बनावट कोरोना निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट (Duplicate corona negative report) बनवून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. पाचोरा पालिकेने याबाबत चौकशी करून टोळीचा पर्दापाश करण्याची मागणी होत आहे. (jalgaon-pachora-coronavirus-duplicate-report-with-corporation-stamp)

गेल्या महिन्यात कार्यालयात लाच लुचपत विभागाचा सापळा यशस्वी झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाची राज्यभरात नाचक्की झाली होती. तरीही केवळ पैशाच्या हव्यासापोटी येथील काळे धंदे थांबायला तयार नाहीत. या कार्यालयात पालिकेच्या नावे अँटीजेन टेस्टचे बनावट रिपोर्ट सादर करून खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत.

Duplicate corona negative report
ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन; गिरीश महाजनांचे नेतृत्‍व

तर सारे गौडबंगाल येणार समोर

सदर प्रकरणाची पुराव्या निशी माहिती मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले आहे. यावेळी पालिका उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, दुययम निबंधक गांगोडे हे ही उपस्थित असल्याचे कळते. बनावट अँटीजेन टेस्ट प्रकरणी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी तातडीने दखल घेऊन पालिकेद्वारा हुतात्मा स्मारकात करण्यात आलेल्या महिनाभराच्या याद्यांची झेरॉक्स प्रत ताब्यात घेणे गरजेचे आहे. त्यातून सारे गौड बंगाल बाहेर येईल. तसेच यामागे असलेल्या रॅकेटचाही पर्दापास होईल. सखोल चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()