जळगावः तरुणांना हटकल्याचा आला राग..चक्क पोलिसाला बेदम मारहाण

Jalgaon Crime News: पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यावर गोंधळ घालणाऱ्या तरुणांची आरसीपी प्लाटूनने यथेच्छ धुलाई केली.
Police
Police
Updated on



जळगाव : शहर पोलिस ठाण्याबाहेर (City Police Station) टॉवरचौकात गुरुवारी (ता. ३०) रात्री ११ वाजेच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी चक्क पोलिस (Police) कर्मचाऱ्यालाच त्याच्याच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

Police
दुर्दैवी घटनाःआईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या मुलीचा मृत्यू

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना घडलेल्या या मारहाणीत माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्यासह शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने पोलिस ठाण्यावर चाल करून, तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल असे म्हणत उपस्थित कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.


पोलिसाला मारहाण
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी किशोर निकुंभ गुरुवारी रात्री रेल्वे स्थानकावरून ठाण्यात परतत असताना त्यांना काही तरुण रात्री ११ वाजेच्या सुमारास टॉवर चौकात विनाकारण फिरताना दिसले. या तरुणांना निकुंभ यांनी हटकले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. वाद वाढल्याने तरुणांनी निकुंभ यांच्या दुचाकीची फायबर काठी काढून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. आवाज ऐकून शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बाहेर आले असता त्यांनी वाद सोडवित पोलिस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्यासह अमन ढंढोरे व रणवीर ढंढोरे यांना पोलिस ठाण्यात आणले.

Police
न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू

जमाव वाढला अन्‌ गोंधळ
पोलिस ठाण्यात आल्यावर मोठा जमाव वाढू लागला. यावेळी ठाणे अंमलदार रवींद्र पाटील यांना शिवचरण ढंढोरे, संदीप ढंढोरे, विलास लोट, नितीन जावळे व वाद घालणाऱ्या इतरांनी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलून अरेरावी केली. महिला कर्मचाऱ्यासही तुम्ही पोलिस फार मातले आहे, तुम्हाला पाहावे लागेल. मी माजी नगरसेवक आहे, माझी पॉवर तुम्हाला दाखवतो असे म्हणून धमकी दिली.

वरिष्ठ अधिकारी दाखल

ठाण्यात जमाव आणि वाद वाढल्याने सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक हे आरसीपी पथक आणि क्यूआरटी टीमसह पोहचले व गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन जमावाला पांगविले. याप्रकरणी किशोर निकुंभ यांच्या फिर्यादीवरून अमन उर्फ आशुतोष ईश्वर ढंढोरे, रणवीर ढंढोरे, शिवचरण ढंढोरे, संदीप ढंढोरे, विलास लोट, नितीन जावळे यांच्यासह ४ अनोळखी जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.


मारून टाका मला मारून टाका..
सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक, यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यावर गोंधळ घालणाऱ्या तरुणांची आरसीपी प्लाटूनने यथेच्छ धुलाई केली. काही मिनिटांपूर्वी गोंधळ घालणारे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर आरोप करत तुमचे लोक दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात दलित माणसावर अन्याय करताय, तुम्हाला परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या.

Police
आई-वडीलांच्या भांडणाला मुलगा कंटाळला; आणि थेट धरणात घेतली उडी

वरिष्ठ अधिकारी ‘नॉट रिचेबल’
पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून तब्बल पाऊण तास शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने पोलिस ठाणे वेठीस धरले होते. हे चित्र पाहून एका सुज्ञ नागरिकाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुन पाहिला, मात्र उपयोग झाला नाही. अखेर नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर याबाबत सूत्रे हल्ली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.