पारोळा : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने डोळे वटारले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पिके पाण्याखाली आली. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) गणित कोलमडले. पुन्हा गुलाबी वादळ, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी या चक्रव्यूहात शेतकऱ्यांच्या आशेवर पाने पुसली गेली. जेमतेम उघडीप झाल्यानंतर पुन्हा १७ ऑक्टोबरला अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले आणि पिके पाण्याखाली (Crop Damage) आली. तालुक्यातील पाचही मंडळात मुसळधार पाऊस झाल्याने कडधान्यासह कापूस, ज्वारी, मका काळी व पिवळी पडू लागली. त्यातच हिरापूर तालुका पारोळा येथील शिवारात मुसळधार पाऊस झाल्याने हाती आलेले पीक वाया जाऊ नये, यासाठी हिरापूर येथील शेतकरी घनश्याम पाटील यांनी अक्षरश: पाण्यातच कपाशी (Cotton) वेचणी केली आहे. शेतातून उत्पन्न निघेना आणि वेचणीसाठी मजूर मिळेना, अशी दैनावस्था शेतकऱ्यांची झाली असून, शासनाच्या मदतीची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी शासनाकडे मदतीची आस धरून आहे. मात्र, कोरोनामुळे कोणतीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. मागील महिन्यात गुलाबी वादळामुळे तालुक्यातील पाचही मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाकडून तालुक्यातील अतिवृष्टीचा जिल्हा कृषी विभागात प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला असून, याबाबत शासनाकडून तत्काळ निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
‘लम्पी’मुळे पशुधनाची चिंता
‘अवकाळी’मुळे शेतात आज देखील पाणी साचले असून, पिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतात टाकलेला पैसा हा उत्पन्ना पोटी येईल का नाही या विवंचनेत शेतकरी असताना पुन्हा पशुधनावर लंम्पी आजारामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. जनावरांना गाठी होणे, जखम होणे असा संसर्ग वाढत असून, यामुळे शेतकऱ्यांची पशुधनाविषयी चिंता वाढली आहे.
दरम्यान, हिरापूर येथील शेतकरी घनश्याम पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, की अवकाळीमुळे शेतात पूर्णपणे पाणी साचले असून, अशा परिस्थितीत देखील आहे तो कापूस मजूर वर्गाकडून वेचून पुन्हा त्यास वाढत ठेवा लागत आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असून, याबाबत निर्णय होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.