जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत बेरोजगार तरुणांना प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत (Prime Minister's Employment Generation Schemes) प्रकल्प अहवाल (Project report) तयार करून तो संबंधित संकेतस्थळावर अपलोड करत कर्ज व पतपुरवठ्यासाठी संबंधित बँकेला पाठविण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना प्रकल्प अधिकाऱ्यास (project officer) अटक (Arrested) करण्यात आली. भुसावळ येथील बेरोजगार तरुणाच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (District Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (project officer arrested for soliciting bribe to clear loan)
भुसावळ येथील पस्तीसवर्षीय बेरोजगार तरुणाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री रेाजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गत कर्ज आणि त्यावर अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राद्वारे प्रकरण तयार केले होते. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे हे प्रकरण शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रकरण राष्ट्रीयीकृत बँकेस पाठवावे लागते. जेणे करून जिल्हा उद्योग केंद्राने मंजुरी दिलेले प्रकरण असल्याने प्राधान्याने राष्ट्रीयीकृत बँका कर्जपुरवठ्यासाठी तयार होतात. संकेतस्थळावर प्रकरण लोड करून ते संबंधित बँकेला पाठविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधीकारी आनंद देवीदास विद्यासागर (वय ५०) यांनी तक्रारदार तरुणाकडे दहा हजार रुपयांची मागणी केली हेाती.
लाचलुचपत विभागात तरुणाची धाव
तक्रादार तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिल्यावर डीवायएसपी सतीश भामरे, निरीक्षक संजोग बच्छाव, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, ईश्वर धनगर, नासिर देशमुख यांच्या पथकाने सापळा रचला. दुपारी जिल्हा उद्योग केंद्रातच प्रकल्प अधिकारी आनंद विद्यासागर यांनी दहा हजाराची लाच स्वीकारताच त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती संशयित विद्यासागर यांना अटक करून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात लाचलुचपत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.