रेल्वेला जळगावकरांचा ‘संसर्ग’; पाच हजार चाकरमान्यांचे हाल

जळगाव जिल्ह्यात संसर्ग साखळी खंडित होऊन अनेक नागरिकांचे दोन्ही टप्प्यांचे लसीकरणदेखील पूर्ण झाले आहे.
Train
Train
Updated on



जळगाव ः कोरोना (corona) संसर्ग साखळी खंडित झाल्याने रेल्वेतर्फे (Train) काही गाड्यांमध्ये सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासाची (Traveling) सवलत आहे. मात्र लसीकरण झालेले असताना रेल्वेतर्फे अपडाउन करणाऱ्यांना रेल्वेत प्रवास नाकारला जातोय.

Train
खानदेशात ॲलर्ट;अहमदनगर जिल्ह्यातून येणार कोरोनाची तिसरी लाट



जळगाव जिल्ह्यात संसर्ग साखळी खंडित होऊन अनेक नागरिकांचे दोन्ही टप्प्यांचे लसीकरणदेखील पूर्ण झाले आहे. यात हजारो शासकीय, खासगी वा अन्य संस्थांमधील नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश आहे. दीड वर्षापासून रेल्वे सुरू असूनही त्यांना रेल्वेत मासिक पास दिली जात नाही. मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, बोदवड, रावेर, वरणगाव, निंभोरा येथून रोजगारासाठी, नोकरीसाठी दररोज पाच हजारांवर चाकरमानी अपडाउन करतात. मात्र रेल्वेत त्यांना अपडाउन करण्यास परवानगी नाही. मासिक पास मिळत नाही.


कोरोना प्रादुर्भावामुळे २४ मार्च २०२० पासून सर्वच रेल्वेसेवा बंद होत्या. त्या काही प्रमाणात जूनपासून ते सद्यःस्थितीत कोविड स्पेशलसह अन्य लांब पल्ल्याच्या विशेष गाड्यांद्वारे आरक्षित तिकिटे घेऊनच प्रवास सवलत आहे. संसर्गाच्या नावाखाली अगोदरच बहुतांश ठिकाणी अनेकांचा रोजगार गेला असून, काहींचे पगार निम्म्यावर आले आहेत. तरीही मनमाड ते भुसावळ, रावेर ते जळगाव, भुसावळ जळगावदरम्यान हजारो नोकरदार, व्यावसायिक, कामगार मासिक पास सवलत नसल्याने नाइलाजास्तव खासगी वाहन वा बसद्वारे ये-जा करीत आहेत.

Train
गोळीबाराने जळगाव पुन्हा हादरले..कांचननगर परिसरात घडली घटना


बसमध्ये गर्दी
संसर्गाच्या नावावर पॅसेंजर मेल एक्स्प्रेसमधून सर्वसाधारण व मासिक पाससेवा बंद आहे; परंतु दुसरीकडे महामंडळाच्या बस भरभरून प्रवासी वाहतूक करीत आहेत. केवळ संसर्ग काळातील तूट भरून काढण्यासाठीच या बस चालविल्या जात असून, यादरम्यान कोरोना संसर्ग होत नाही का, असा प्रश्‍न दैनंदिन प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. लशीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना तरी मासिक पासद्वारे मेल-एक्स्प्रेसमधून व पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवासाची सवलत द्यावी, अशी मागणी नियमित प्रवाशांमधून केली जात आहे.


डेमू, मेमू लोकोशेडमध्ये उभ्या
कोरोना संसर्गाच्या लॉकडाउननंतर पॅसेंजरऐवजी डेमू, मेमू सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सद्यःस्थितीत भुसावळ लोकोशेडमध्ये डेमू, मेमू उभ्या आहेत; परंतु राज्य शासनाची परवानगी नसल्याने या गाड्या धूळखात उभ्या आहेत, तर कर्मचारीदेखील अन्यत्र सेवांमध्ये वळते करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. असे असताना रेल्वेने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, सर्वच रेल्वेतून मासिक पासधारकांना अपडाउन करण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.