रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास म्युकरमायकोसिसचा धोका

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास म्युकरमायकोसिसचा धोका
Dr dharmendra patil mucormycosis
Dr dharmendra patil mucormycosissakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कोरोना महामारीच्या (Jalgaon coronavirus update) दुसऱ्या लाटेचा उद्रेक फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. त्यानंतर कोरोनापेक्षा भयंकर अशा म्युकरमायकोसिसचे रुग्ण (risk of mucomycosis) आढळून येत असून, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होत असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले. (jalgaon-risk-of-mucomycosis- immune-system-is-weakened)

मार्च महिन्यात डॉ. पाटील यांनी या आजाराबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Jalgaon abhijit raut) यांची भेट घेत आजाराची संभाव्य कारणे कोणती, याची माहिती दिली होती. कोविडने ग्रस्त असणाऱ्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आढळून येत आहे. कोविड आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यातच उपचार म्हणून स्टिरॉइड्सचे सेवन केले जाते. बहुतांश रुग्णांमध्ये अनियंत्रित मधुमेह असतो. अशा विविध कारणांमुळे म्युकरमायकोसिस हे जीवघेणे फंगल इन्फेक्शन डोके वर काढत आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. प्रसंगी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Dr dharmendra patil mucormycosis
रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस एक दुर्मिळ फंगल इंफेक्शन आहे. याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते.

लक्षणे अशी : तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोळ्यांच्या बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाकाला सूज येणे, सायनस रक्तसंचय.

म्युकरमायकोसिस कसा पसरतो?

श्वासोच्छवास, त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. म्युकरमायकोसिस मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा, नाक, डोळ्याला हळूहळू सूज येताच या फंगल इन्फेक्शनचे तत्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.

Dr dharmendra patil mucormycosis
डॉक्‍टर असल्‍याचे भासवत उपचार; कोरोना काळातही जीवाशी खेळ

उपचार म्हणजे नक्की काय?

डोळे, गाल, अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर अॅन्टिफंगल औषधी त्वरित सुरू करावी. कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्याने या फंगसचे संक्रमण वाढताना दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे असा त्रास जाणवतो. अॅन्टिफंगल औषधोपचार, शस्त्रक्रियेद्वारे वेळीच उपचार झाल्यास डोळे वाचलिण्यात डॉक्टरांना यश येऊ शकते.

अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात. तेव्हा वेळीच नजरेत आलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या नेत्ररोगतज्ज्ञ, कान, नाक, घसातज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोविडपासून मुक्त झाल्यावर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सकस आहार घ्या.

- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.