सावद्याची कन्या झाली अब्जाधीश; तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा

सावद्याची कन्या झाली अब्जाधीश; तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा
neha narkhede
neha narkhedeneha narkhede
Updated on

सावदा (जळगाव) : अमेरिकन शेअर बाजारात आयपीओ आल्यानंतर पहिल्याच दिवशी जोरदार मुसंडी मारणाऱ्या कॉन्फ्युएन्ट (Confluent) कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्या देशासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण या कंपनीची सहसंस्थापक आहेत एक मराठी तरुणी नेहा नारखेडे. आणि त्या आहेत जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील रहिवासी. त्याचे बालपण व शिक्षण हे पुण्यात झाले आहे. स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा.. (jalgaon-savda-neha-narkhede-american-shear-marketing-work)

neha narkhede
तर..दहा वर्षांनी जळगावचे तापमान चार अंशांपर्यंत खाली

न्यूयॉर्क, 28 जून : कॅलिफोर्नियातली कॉन्फ्युएन्ट ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक या शेअर बाजारात गुरुवारी (२४ जून) लिस्ट झाली. ३६ डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे ८२८ दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन ९.१ अब्ज डॉलर एवढे झाले. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास २५ टक्के वाढ झाली आणि ते मूल्य ४५.०२ डॉलर प्रति शेअर एवढे झाले. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी आयपीओ आल्यानंतर हा एवढा भाव मिळवल्याने कॉन्फ्युएन्ट कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे. पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाऊन तिथे स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी यशाची खरी बातमी आहे. त्यामुळे कंपनीचे भांडवली बाजारमूल्य ११.४ अब्ज डॉलर एवढे झाले. या घटनेमुळे या कंपनीच्या तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ती तिसरी संस्थापक नेहा नारखेडे आहे. कंपनी स्थापन केल्यापासून सात-आठ वर्षांत हे यश त्यांना मिळाले आहे.

neha narkhede
मध्य प्रदेश सह पहाडपट्टीतील हजारो मजूर कामाच्या शोधात सपाटीवर!

नेहासह तिघांनी विकसीत केले टेक्निकल टूल

‘फोर्ब्ज'ने दिलेल्या वृत्तानुसार, जय क्रेप्स, नेहा नारखेडे आणि जून राव हे तिघे लिंक्डइन (LinkedIn) या प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते. लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज आदींचे व्यवस्थापन सोपे होण्याच्या दृष्टीने या तिघांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेले एक टेक्निकल टूल २०११ मध्ये विकसित केले. त्यातूनच २०१४ मध्ये कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी उभारली. नेहा नारखेडे ही त्या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच तंत्रज्ञानविषयक मुख्य अधिकारी आहे.

'फोर्ब्ज'कडूनही दखल

सीएनबीसी ‘डॉट कॉम'ने काही कालावधीपूर्वी नेहाचा प्रेरक प्रवास उलगडणारा लेख प्रसिद्ध केला होता. तर २०१९ मध्ये 'अमेरिकेतल्या सर्वांत श्रीमंत सेल्फ-मेड महिलां'च्या 'फोर्ब्ज'ने प्रकाशित केलेल्या यादीत नेहाचं नाव प्रकाशित झाले होते.

असा झाला प्रवास...

सावद्यासारख्या एका लहान शहरातील व पुण्याची मुलगी अमेरिकेतली कोट्याधीश नेहाला तिच्या वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा संगणक हाताळायला मिळाला. तेव्हा ती भारतातच होती. तेव्हापासून तिने तंत्रज्ञान क्षेत्राचा ध्यास घेतला आणि त्यात अभ्यास करत पुढे जात राहिली. २००६ मध्ये जॉर्जिया युनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्स शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.