बियाणे, खतांचा काळाबाजार कृषी विभागाचे कंट्रोल रूम रोखणार

बियाण्यांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे.
biyane khat
biyane khatbiyane khat
Updated on

जळगाव ः जिल्ह्यात आगाम खरिप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, किटक नाशके यांचा काळाबाजार होण्यावर प्रतिबंधासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे. त्यात दहा जणांची नियुक्ती करण्यात आली. बियाणे, खते, इतरबाबींचा कोठे काळाबाजार होत असल्याचे वा कमी किमतीत विकत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी कंट्रोल रूममध्ये तक्रार द्यावी अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.

biyane khat
जिल्हा कोविड रुग्णालयांवर आता सोळा शिक्षकांची नियुक्ती

खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेगळया अडचणी आल्याचे निदर्शानास येते. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. त्याच बराबर सध्या कोवीड विषाणुचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहिर केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने बियाणे, खते ब किटकनाशके यांचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतुक, वितरण व विक्री करतांना अडचणी निर्माण होऊ शकतात. निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर बियाण्यांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे.

biyane khat
निर्यातदार कंपन्यांना रेमडेसिव्हिर वितरणास मान्यता

यामुळे बियाणे, खते ब किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठयाचा अनुषंगाने येणा-या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहील. संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण- ९३०७५२५६२० व पी.एस.महाजन, ९७६७९४७२४७, कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ तसेच टोल फ्री क्रमांक ९८००२३३४००० या क्रमांकावर सुध्दा संपर्क करता येईल. कृषी विभागाच्या मेलवर ही पाठविता येईल. बियाणे, किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची दिनांक निहाय रचना खालील प्रमाणे राहील. संतोश भावसार, मुकेश सूर्वे, निलेश वानखेडे, सुनिल पाटील, अमित पाटील, स्वप्नील पवार, समाधान देवरे आदी दहा कर्मचाऱ्यांची नियूक्ती करण्यात आली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.