जळगावः ऐन गर्दीत एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद; प्रवासी वेठीस

राज्‍य सरकारने आंदोलन बेकायदेशीर असल्‍याचे ठरवत कर्मचारींना कामावर रूजू होण्याचे सांगितले होते.
Jalgaon ST Bus stand
Jalgaon ST Bus stand
Updated on

जळगावः वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्‍या (State Transport Corporation) जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारपासून अचानक कामबंद आंदोलन (Work stoppage movement) सुरू केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने येथून जाणाऱ्या बस सेवेवर परिणाम झाला असून, भाऊबीजनिमित्त (Bhaubeej) गावी जाणाऱ्यांची गर्दी असल्‍याने प्रवासी वेठीस धरण्याचा प्रकार झाला आहे.

Jalgaon ST Bus stand
जळगावच्या विकासाचे शत्रू कोण..!



जळगाव आगार अचानक बंद
दिवाळी उत्‍सव हा महामंडळासाठी गर्दीचा हंगाम मानला जातो. या दिवसात महामंडळाला मोठ्या प्रमाणा उत्‍पन्‍न मिळत असते. परंतु, या गर्दीच्‍या हंगामातच बससेवा बंद केल्‍याने उत्‍पन्‍न बुडत आहे. जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारनंतर अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळपासून सुरळीत बससेवा सुरू असताना कामबंद आदोलनामुळे सेवा विस्‍कळित झाली आहे.

Jalgaon ST Bus stand
शहादा : बारा लाखांची गांजाची झाडे मलगाव येथे जप्त


प्रवासी वेठीस
राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्‍या मागण्या रास्‍त आहेत. परंतु, भाऊबीजेनिमित्त माहेरवाशिणींची गर्दी आहे. तर काही जण दिवाळीला गावी आले असताना आज रविवारनंतर सुटी संपणार असल्‍याने परतीच्‍या प्रवासाला लागले आहेत. यामुळे बसला गर्दी आहे. अशा काळात कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी बससेवा बंद करणे म्‍हणजे प्रवाशी वेठीस धरण्याचा प्रकार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.