जळगावः ‘ते’ ३५ कोटी ‘रब्बी’ला ‘खरिपा’ला केव्हा?

शासनाचा हा निर्णय बाहेर आल्यानंतर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
जळगावः ‘ते’ ३५ कोटी ‘रब्बी’ला ‘खरिपा’ला केव्हा?
Updated on


भडगाव : राज्य शासनाने ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain) नुकसानीपोटी दोन हजार ८०० कोटींची मदत जाहीर केली. मात्र, त्यात जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला एक दमडीही मिळाली नाही. जिल्ह्यात खरीप हंगामाचे (Kharif Season) तब्बल पाच लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. राज्य शासनाने (State Government) ६ ऑक्टोबरला मार्च ते जूनदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीपोटी राज्यासाठी १२२ कोटींची मदत जाहीर केली होती. त्यात जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये आले आहेत. मात्र ‘ती’ मदत रब्बीच्या नुकसानीची आहे.

जळगावः ‘ते’ ३५ कोटी ‘रब्बी’ला ‘खरिपा’ला केव्हा?
यावल: काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक जप्त

आता खरिपाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ‘ती’ मदत दिली आहे, म्हणून खरिपात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणजे झाले. लोकप्रतिनिधीनींही याबाबत शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाकडे मांडणे आवश्यक आहे. शासनाचा हा निर्णय बाहेर आल्यानंतर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

जळगावः ‘ते’ ३५ कोटी ‘रब्बी’ला ‘खरिपा’ला केव्हा?
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६३ मुहूर्त


...ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात गौताळा व औट्रम डोंगरात झालेल्या ढगफुटीमुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यांत प्रचंड नुकसान झाले. भडगाव तालुक्यातील ९१, तर चाळीसगाव तालुक्यातील ७५७ हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेली. ५० हेक्टरवरील जमिनीची मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेकडो जनावरांनी पाण्याच्या प्रवाहात जलसमाधी घेतली. अनेकांची घरे पडून संसार उघड्यावर आले. दुकाने पाण्यात बुडाल्याने रोजगाराचे साधन गेले. या नुकसानीची कृषीमंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार, खासदारांनी भेटी देऊन पाहणी केली. तत्काळ मदत देण्याबाबत आश्वासन दिले. मात्र, त्यांनाही या मदतीत एक रुपया मिळालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचीही क्रूर चेष्टा केल्याच्या प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.