जागतिक पोपट दिवस..आणि निर्सगाचा पोपटांना असाही तडाखा !

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तसेच किमान दीडशे ते दोनशे पोपट आणि बगळे जखमी झाले
Parrot
ParrotParrot
Updated on

जळगाव ः 31 मे हा जागतिक पोपट दिन (World Parrot Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मात्र या दिवसाची रात्र पक्षांसाठी काळ रात्र बनून आली. म्हसावद जवळील बोरनार (ता. जळगाव) येथे सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वादळ (Storm) झाले. यावेळी बारीक लहान आकाराच्या गार कोसळल्या. झालेल्या या गारपीटमध्ये गिरणा नदीच्या काठावरील झाडांवर रात्री निवारा असलेल्या पोपट (Parrot) आणि गायबगळे यांची मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली.

(storm hail kills many parrots)

Parrot
नोकरी सुटली..तरी नाउमेद झाला नाही, आणि बनला ‘मोबाईल चहावाला’

सोसाट्याचा वारा तुफान पाऊस तासभर सुरू होता. कडुनिंबाच्या झाडावर रात्री निवारा म्हणून बसलेल्या शेकडो पक्षांना याची कल्पना नव्हती की पूढे काय होणार त्यातच गारपीट सुरू झाली आणि क्षणात पाऊस पडावा तसे पक्षी झाडावरून पडू लागले सुमारे 200 पोपट आणि गाय बगळे मृत्युमुखी पडले. आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तसेच किमान दीडशे ते दोनशे पोपट आणि बगळे जखमी झाले याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी देवदूता सारखी धाव घेत बचाव कार्य सुरू केले हातांना चावा घेत असून देखील प्रमोद बडगुजर आणि सहकाऱ्यांनी तातडीने जखमी पोपटांना गोळा करत त्यांना नदी काठीच सुरक्षित स्थळी हलवले वरतून टोपले झाकले.

आणि बचावकार्य सुरू

दरम्यान गावकऱ्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधत बचाव कार्य सुरू ठेवले वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, योगेश गालफाडे, उद्योजक समीर साने, बाळकृष्ण देवरे यांनी बचाव कार्य साठी लागणारे आवश्यक साहित्य प्रथमोपचार पेटी, घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली नदीकाठी जाऊन परिसराची पाहणी केली. परिस्थीती बघता 4 पोपट किरकोळ जखमी आणि इतर पोपट हे सुस्थितीत परंतू भेदरलेल्या अवस्थेत आढळून आले बहुतांश पोपट हे जुवेनाईल म्हणजे प्रौढावस्थेत पदार्पण करत असलेले होते सुमारे तासभर बचावकार्य करून गावकरी आणि संस्थेची टीम मुख्य रस्त्यावर आली. दरम्यान वनविभागाचे वाहन घेऊन वनरक्षक आणि कर्मचारी गावात दाखल झाले पोपटांची पाहणी करून सगळे पक्षी वनविभागाचे ताब्यात देण्यात आले.

Parrot
खडसेंच्या दारी फडणवीस...अनेकांच्या उंचावल्या भुवया

रात्रीची परिस्थिती बघता आणि पक्षांच्या सुरक्षे च्या दृष्टीने पक्षांना जास्त त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला रात्रीच येण्याची विनंती केली वनविभागाचे पथक व आम्ही घटनास्थळी जाऊन मध्यरात्री पाहणी बचावकार्य केले गावकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने 43 पक्षांचा जीव वाचला आहे यात एक गाय बगळा किरकोळ जखमी अवस्थेत होता. परिस्थिती बघता रात्री मोजणी, पंचनामा झाला नाही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र चोपडे यांनी सकाळी पक्षांची वैद्यकीय तपासणी केली 4 पोपट वगळता सगळे सुस्थितीत आहेत.

-रविंद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, जळगाव

रात्री सगळेच पक्षी घरट्यात थांबत नाहीत अंडी आणि पिलांचा सांभाळ करण्यासाठी पालक पक्षी घरट्यात असतो जे पक्षी प्रौढावस्थेत पदार्पण करत असतात ते सगळेच पक्षी एखाद्या सुरक्षित झाडावर बसतात याला पक्षांचा रात्रींनिवारा म्हणतात , गाय बगळे, वंचक बगळे बहुतेक बाभळीच्या झाडावर घरटे करतात आणि शेकडो बगळे नदीकाठी अश्याच झाडांवर रात्री निवारा करतात अचानक झालेल्या वादळ आणि गारपिटीने या पक्षांना सावरण्याची संधी मिळाली नाही अंधार असल्याने देखील पक्षी सैरभैर झाले आणि खाली पडले

- बाळकृष्ण देवरे वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

Parrot
फडणवीस खडसेंच्या घरी; चर्चा मात्र कमळाच्या घड्याळाची

गावकऱ्यांनी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय आहे त्यांच्या मुळेच उर्वरीत पक्षी जिवंत आहेत . पक्षी जखमी झाले ही माहिती गावातील कुत्रे मांजरांना तात्काळ कळली नदीकाठावर येत अनेक पक्षी मांजर , कुत्र्यांनी पकडून नेले बचावकार्य केले नसते तर सगळे पक्षी मेले असते गावकऱ्यांचे कार्य उल्लेखनीय आहे संस्थेच्या वतीने गावकर्यांचा सत्कार करण्यात येईल

- योगेश गालफाडे वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.