एकदा शिकवा अन् विद्यार्थ्यांनो‌ वारंवार पहा...गुरुजींचा ‘गुगल क्लासरुम’  

google class
google class
Updated on

पहूर (ता. जामनेर) : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाइन शिक्षण उपक्रमाला बळ देण्यासाठी तसेच शिकवलेले व्हिडीओ राखून ठेवण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने गुगलची मदत घेतली आहे. ही गुगल क्लासरूम यंत्रणा हाताळण्यासाठी राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना लॉगइन आयडी देण्यात येणार आहेत. 

 
राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनादेखील सहभाग घेता यावा, यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने गुगल क्लासरूमची मदत घेण्याचे ठरविले आहे. आता सध्या असलेल्या ऑनलाइन शिक्षण सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ एकदाच धडे पाहता येणार आहे. मात्र, गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शिकविण्यात येणारे वर्ग विद्यार्थ्यांना केव्हाही पाहता येते आणि अभ्यास करण्यासाठी पुन्हा शिक्षकांचे शिकवलेले धडे पाहता येतात. विद्यार्थ्यांना गुगलक्लास रूममध्ये सहभागी होण्यासाठी जी सूटचे आयडी तयार करावे लागतात. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गुगलवर स्पेस उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन क्लासरूममध्ये सहभागी होऊन आपले मत नोंदवू शकतो. 


..अशी करा नोंदणी 
एकाचवेळी २५० विद्यार्थी यावेळी सहभागी होऊ शकतात. त्यामुळे हे गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. शिक्षकांना https://google.addingdimensions.in/Home.aspx या लिंकवर नोंदणी करायची आहे. या उपक्रमामुळे शिक्षक - विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे तंत्रस्नेही शिक्षकांनी सांगितले.


संपादन : राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()