बारावीच्या प्रवेशप्रक्रियेला ऑनलाइन सुरवात

बारावीच्या प्रवेशप्रक्रियेला ऑनलाइन सुरवात
 Twelfth admission
Twelfth admissionsakal
Updated on

जळगाव : कोरोना महामारीने (Coronavirus) बोर्डाच्या दहावी व बारावीची परीक्षा रद्द करून मागील वर्षीच्या गुणांच्या आधारे निकाल देण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अकरावी विद्यार्थ्यांची मात्र परीक्षा ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका (Online exam) देऊन ऑफलाइन उत्तरपत्रिका सबमिट करण्यास सांगण्यात आले आहे. काही महाविद्यालयांनी मात्र अकरावीची परीक्षा ऑनलाइन घेतली, निकालही ऑनलाइन जाहीर केला. आता बारावीची प्रवेशप्रकियाही (Twelfth grade online admissions) ऑनलाइन सुरू केली आहे, तर काही महाविद्यालयांत अकरावीच्या उत्तरपत्रिका सबमिशनची प्रक्रिया सुरू आहे. (jalgaon-Twelfth-grade-admissions-process-start-begins-online)

 Twelfth admission
शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ब्रिज कोर्स

बारावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन की ऑफलाइन याबाबत अनेक महाविद्यालयांत गोंधळाचे वातावरण असले, तरी जूनअखेर बारावीची प्रवेशप्रकिया पूर्ण होणार आहे. कोरोना महामारीने मागील अर्धे शैक्षणिक वर्ष वाया गेले. दिवाळीपर्यंत ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ कायम होता. नंतर विद्यार्थी एकत्र आले तर कोरोनाचा अधिक फैलाव होईल म्हणून अनेक शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला. त्यानंतर दुसरी लाट आता कोठे आटोक्यात येत आहे. असे असले तरी यंदाही शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश नाहीत. खासगी शाळांची तर मोठी गैरसोय झाली आहे. मागील वर्षी विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत, तरी मागील वर्षाची फी वसुली त्यांनी सुरू केल्याने अनेकांनी शाळांबाबत शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, न्यायालयात तक्रारी करीत दाद मागितली आहे.

प्रवेशाची लगबग

दहावी, बारावीची बोर्डाची परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आदेश आहेत. निकाल आल्यानंतर अकरावी व प्रथम वर्षासह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेबाबत शासन निर्णय घेईल. तूर्तास तरी बारावीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

 Twelfth admission
भयंकर घटना : वीज थेट डोक्यावर पडली; दोन जण ठार !

धनाजीनाना प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. निकालही जाहीर करून आता बारावीची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. आजपासून कला, विज्ञान, वाणिज्य शाखेनुसार उत्तरपत्रिका सादर करण्यास विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले आहे. बारावीची प्रवेशप्रकिया २८ ते ३० जूनदरम्यान होणार आहे.

- डॉ. एल. पी. देशमुख, प्राचार्य, जळगाव

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात अकरावीची प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन देण्यात आली होती. उत्तरपत्रिका ऑफलाइन लिहून विद्यार्थ्यांना सादर करण्यास बोलावले आहे. १५ जूनपासून बारावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. ती प्रक्रिया ऑफलाइन की ऑनलाइन हे अद्याप ठरायचे आहे.

- डॉ. गौरी राणे, प्राचार्या, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.