मातृआक्रोशाने ‘यम’राजही माघारी!

आईदेखत दोन्ही तरुण मुले परस्परविरुद्ध दिशेला फेकले गेले
Lightning struck
Lightning struckLightning struck
Updated on



जळगाव : शेतात (Farm) कापसाची पेरणी (Cotton sowing) करताना पाऊस आल्याने रेखाबाईंच्या दोघा मुलांनी लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला अन्‌ त्याच झाडावर वीज कोसळली. डोळ्यादेखत मुलांवर वीज कोसळल्याने आक्रोश करतच आई धावत सुटली... वीज पडल्यावर (Lightning struck) कोणी वाचणे शक्य नसताना दोघे जखमी भाऊ सुखरूप असून, विधवा आईच्या आक्रोशाला पाहून जणू यमराजही पळून गेला असावा, या चर्चेने जोर धरला. (two brothers were injured in a lightning strike)

Lightning struck
जळगावात खासगी इंग्रजी, सीबीएसई शाळांची मुजोरी

म्हसावद येथील रेखाबाई माधव पाटील या कुणाल (वय २९) व चेतन (२७) अशा दोन्ही मुलांसह कापूस पेरणी करत होत्या. अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पेरणी थांबवून दोन्ही मुले धावत कडुलिंबाच्या झाडाखाली थांबली. थोड्याच वेळात त्याच झाडावर वीज कोसळली. हे चित्र रेखाबाईंनी पाहिले. आईदेखत दोन्ही तरुण मुले परस्परविरुद्ध दिशेला फेकले गेल्याने हंबरडा फोडतच त्या धावत सुटल्या...शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांसह शेतकरी, ग्रामस्थ मदतीला धावून आले. बेशुद्ध मुलांना जळगावी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान दोघांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांनी पंचनामा केला असून, जखमी कुणाल व चेतन यांची प्रकृती स्थिर आहे.

Lightning struck
कोरोनाच्या हद्दपारीसाठी १,१५३ गावांत दक्षता समित्या


वृद्धापकाळाची काठी सुरक्षित

कुणाल व चेतन यांचे पितृछत्र यापूर्वीच हरपले आहे. आईसोबत दोघे भाऊ शेती करून उदरनिर्वाह करतात. रेखाबाई यांना दोन मुलांचाच आसरा आहे. आईच्या आक्रोशाने झालेला चमत्कार म्हणून दोघा जखमी भावांची भेट घ्यायला नातेवाईक, मित्रपरिवाराने रुग्णालयात गर्दी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()