जळगाव : रामनगरातील गणेश मंडळातील (Ganesh Mandal) वाद्य बंद करण्याच्या वादातुन (Disputes) दोन गटात घामासान हाणामारी झाल्याची (Fights) घटना घडली. चाकु-विळा, लाठ्या काठ्यांसह दगडफेक होवुन देान्ही गटातील लोक जखमी झाली. वेळीच पोलिसांनी (Police) धाव घेतल्यावर वाद शांत होवुन परस्परविरुद्ध तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Disputes between the two groups
रामनगरातील वंदनाबाई सौदागर खामकर यांच्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, मनकर्णाबाई यांच्या दुकानात गणपती बसवीला असून शुक्रवारी रात्री सौदागर खामकर यांनी वाद्य बंद कारण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन भुऱ्या याने चाकु काढून हल्ला चढवला तर, राजेंद्र मराठे याने विळ्याने वार केल्याने सौदागर खामकर, अशोक खामकर दोन्ही भाऊ जखमी झाल्याने एकच गोंधळ उडून दगडफेकीला सुरवात झाली.
पोलिस आल्याने वाद निवळला
रामनगर भागात दगडफेकीसह हाणामारी झाल्याचे वृत्तकळताच निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटिल यांच्यासह पोलिस ठाण्याची कुमक वेळीच घटना स्थळी दाखल होवुन हाणामारी करणार्यांना जागेवरच प्रसाद देत जखमींना जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.