फायनान्स कंपनीच्या नावाने बेरोजगार तरुणाला फसवीले

सर्व प्रोसेस करुनही कुणालाही कर्ज न मिळाल्याने संबधीतांनी चौकशी करण्यास सुरुवात केली.
Fraud
Fraud
Updated on

जळगाव : फायनान्स लिमिटेड कंपनीत नोकरीसह कंपनीकडुनच कर्ज (Lon) काढुन देण्याचे आमिष दाखवत पाचोरा तालूक्यातील तरूणासह इतरांची ५ लाख २३ हजार ८१० रुपयांत फसवणुक झाली आहे. ऑनलाईन (Online) पद्धतीने पैशांची देवाण घेवाण झाल्याने सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद (Police Case) करण्यात आली आहे.

Fraud
धुळे मनपावर भाजपचाच झेंडा; महापौरपदी प्रदीप कर्पे


पिंपळगाव हरेश्वर(ता.पाचोरा) जीवन कैलास बोढरे (वय २७,रा.गोविंद पुरा ) या तरुणाचे सलून दुकान आहे. सलून दुकानावर मेहनत करुन त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह तेा, भागवतो. बुधवार(ता.१५) सप्टेंबर दरम्यान जीवन यास वेगवेगळ्या नावाने अज्ञात लोकांनी संपर्क साधला. टाटा फायनान्स लिमीटेड या कंपनीतून बोलत असून तुमची चांगल्या पगारवर कंपनीत निवड झाली आहे, असे सांगत टाटा कंपनी आपल्याला विनातारण कर्जही देत असुन सोबत नोकरीही मिळणार आहे.

Fraud
उसतोड मजुरांकडून मुकादमाची साडेचार लाखांची फसवणूक

अशा बाता मारुन या तरुणांचा विश्वास संपादन करुन बँकेच्या डीटेल्ससही शैक्षणीक कागदपत्रे या भामट्यांनी मागवुन घेतले. तुम्हाला लोन (कर्ज) मंजुर झाल्याचे सांगत प्रासेसिंग फि, डिक्लेरेशन चार्जेस, जिएसटी, स्टॅम्प फि, एनईफटी चार्जेस आदींसह बँक फी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जिवन बोडरेसहीत इतर तरुणांकडून ५ लाख २३ हजार ८१० रुपये इतकी रक्कम लुबाडणूक केली. सर्व प्रोसेस करुनही कुणालाही कर्ज न मिळाल्याने संबधीतांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे निदर्षनास आल्यावर जीवन बोढरे या तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.