जळगाव जिल्‍हा पूर्ण क्षमेतेने अनलॉक; तरीही काही ठिकाणे ५० टक्‍के बंदच

जळगाव जिल्‍हा पूर्ण क्षमेतेने अनलॉक; तरीही काही ठिकाणे ५० टक्‍के बंदच
jalgaon unlock
jalgaon unlocksakal
Updated on

जळगाव : कोरोना महामारीतून (Coronavirus) मूक्तता मिळण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून लावण्यात आलेल्या सर्व निर्बंधांना आता फुलस्टॉप देत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Jalgaon collector abhijit raut) यांनी उद्यापासून (ता.७) सर्व दुकाने, रेस्टॉरंट, मॉल्स, बार यांना पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश आज काढले आहेत. मात्र कोरोना संसर्गापासून बचावासाठी लग्न समारंभ, अत्यंयात्रांना केवळ ५० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. सर्व दुकानांची वेळ आता सकाळपासून रात्री ९ पर्यंत असणार आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ईपासची (Jalgaon unlock) गरज नाही. सामाजीक अंतर, चेहऱ्यावर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. (jalgaon-unlock-after-lockdown-but-no-order-jalgaon-administrestor)

शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती राहील. धार्मिक, सामाजीक, सांस्कृतीक, राजकीय, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना शंभर लोकांच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन तासांचा अवधी या कार्यक्रमांसाठी आहे.

jalgaon unlock
खेळता खेळता चिमुरडीचा मृत्‍यू; डोक्‍यावर पडल्‍याने दुखापत

तर आदेश बदलतील

ीभविष्यात जळगाव जिल्हयाचा पॉझीटीव्ही रेट ५ टक्के किंवा अधिक झाल्यास किंवा ऑक्सीजन बेड २५ टक्के पेक्षा अधिक भरले गेल्यास अनलॉकच्या आदेशात सुधारणा करून नवीन आदेश काढण्यात येतील. यामुळे कोरेाना संसर्गाचे रुग्ण वाढू नये याासाठी सर्वांनीच सामाजीक अंतर पाळणे, मास्क लावणे, गर्दी जाणे टाळणे आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हे पूर्ण क्षमतेने सुरू राहणार..

सर्व प्रकारची दुकाने, क्रीडा प्रकार, विविध स्पर्धा, सर्व प्रकारच्या बैठका, ग्रामपंचायत व को-ऑपरेटीव्ह निवडणूका, सर्व प्रकारची बांधकामे, कृषी संबधित कामे, ई कॉमर्स सुविधा, सार्वजनिक वाहतुक व माल वाहतूक व्यवस्था, सर्व कंपन्या, सर्व निमिर्ती करणारे घटक, आस्थापना, सर्व निर्यात करणारे घटक, आस्थापना.

jalgaon unlock
उघड्यावर आलेल्‍या कुटुंबाच्या मदतीला अधिकारी आले धावून

५० टक्के क्षमतेसह हे सूरू राहणार

शॉपींग मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टीपेक्स, क्रीडा प्रकार, शुटींग, तत्सम स्पर्धा, जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.