जळगाव ः कोरोना (corona) महामारीची दुसरी लाट ( corona second wave)संपुष्टात येत असतानाच ‘डेल्टा प्लस’चे (Delta Plus) रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही, मात्र कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपणच स्वयंशिस्तीचे पालन करू शकतो. याचा प्रत्यय जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना (Gram Panchayats) आला आहे. कोरोनाला गावहद्दीच्या बाहेरच गाडायचा, असा संकल्प सोडत जिल्ह्यातील एक हजार १५३ गावांत कोरोना दक्षता समित्या (Corona Vigilance Committees) स्थापन झाल्या आहेत. गावातील एकालाही लागण होऊ न देण्यासाठी कोरोना संसर्गाचे नियम काटेकोरपणे पाळण्यावर या समित्या भर देत आहेत. (vigilance committees in villages for deportation of corona)
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोनामुक्त गाव संकल्पनेत प्रत्येक गावात कोरोनाविरोधी दक्षता समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते. गावातील सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील, तलाठी, आशा वर्कर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महसूल कर्मचारी यांचा समितीत समावेश आहे. समितीचे सदस्य ग्रामस्थांना कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत. कोरोना कशामुळे होतो, तो न होण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, एकाच ठिकाणी गर्दी न होऊ देणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे आदी सूचना वारंवार करीत आहेत. जर एखाद्याला श्वास घेणे, ताप येणे आदी लक्षणे दिसून आलीच तर लागलीच त्याची कोरोना चाचणी करून घेणे, ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणे, तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही कोरोना चाचणी करणे, त्यात पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावर त्वरित उपचार करणे.
त्यासोबतच गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या तोंडाला मास्क आहे किंवा नाही, तो वारंवार हात धुतो किंवा नाही, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होते किंवा नाही याबाबत दक्षता घेऊन गावात कोरोना शिरणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
एक प्रशिक्षण पूर्ण
गेल्या महिन्यापासून समितीतील सदस्यांना ऑनलाइन पद्धतीने कोरोनाला रोखण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. दक्षता समितीने जिल्हा प्रशासनाला अपेक्षित असलेली माहिती देणे (त्यात संशयित रुग्णांचा शोध, चाचणी, त्वरित उपचार) आवश्यक आहे. जेवढ्या लवकर रुग्ण सापडतील तेवढ्या लवकर ते बरे होतील.
गावातील रुग्ण जेव्हा गंभीर स्थिती होतो, तेव्हा गावातील पदाधिकारी त्या रुग्णाला बेड मिळाला पाहिजे, ऑक्सिजनची सुविधा पाहिजे यासाठी शोधाशोध करतात. मात्र जर रुग्ण लवकर आढळला तर त्याच्यावर लवकर उपचार केले जातात. तो लवकर बरा होतो. त्यादृष्टीने कोरोना दक्षता समित्या कार्यरत आहेत.
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.