वडील कारागृहात त्यात आईनेही सोडले जग..दोघे चिमुकले झाले पोरके

मृत लक्ष्मी यांचे पती सचिन सैंदाणे जुने जळगावातील डॉ. आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबार प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहेत.
Death
Death
Updated on


जळगाव : शहरातील जुने जळगाव भागातील आंबेडकनगरातील विवाहितेने गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मी सचिन सैंदाणे (वय २९) असे मृत विवाहितेचे (Woman) नाव असून, तिचे पती सचिन सैंदाणे आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबार प्रकरणात कारागृहात आहे. कौटुंबीक नैराश्यातून या विवाहितेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Death
Jalgaon : घरी बसून मुलं झाली हट्टी अन्‌ उद्धट


जुने जळगाव भागातील आंबेडकनगरातील लक्ष्मी सचिन सैंदाणे यांनी मंगळवारी सातपूर्वी राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी लक्ष्मी यांना मृत घोषित केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. नम्रता अच्छा यांच्या माहितीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. लक्ष्मी सैंदाणे यांनी गळफास घेतला, तेव्हा घरात कुणीच नव्हते. तिचे काका कामावर गेले होते. तिच्या मागे पती सचिन, आठ वर्षीय मुलगा संघर्ष, पाच वर्षीय मुलगी आरुषी असा परिवार आहे.

Death
एकनाथ खडसे, गिरीश महाजन, देवकरासह दिग्गजांच्या अर्जावर हरकती


पितृप्रेमाला पारखे अन्‌ ममत्वही आटले
मृत लक्ष्मी यांचे पती सचिन सैंदाणे जुने जळगावातील डॉ. आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबार प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहेत. कुटुंबात आठ वर्षीय संघर्ष आणि लहान आरुषी वडिलांच्या प्रेमाला पारखे झाले आहेत. आई लक्ष्मीने आजवर त्यांचा नेटाने सांभाळ केला. मात्र, नैराश्यातून अखेर तिनेही गळफास घेतला. वडील कारागृहात आणि आईचे निधन झाल्याने या दोघा लेकारांकरांची जबाबदारी काकावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.