तरुणावर रोखले पिस्तुल;चालक पळवल्याच्या संशयातुन मारहाण

crime
crime
Updated on



जळगाव ः शहरातील ढाकेवाडी येथील रहिवासी तरुणाला एका वाळूव्यवसायीकाने डोक्याला पिस्तुल लावुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीने भांबावलेला तरुण तक्रारीसाठी रामानंदनगर पोलिसांत येवुन धडकला. रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणाची कसुन चौकशी सुरु असल्याने गुन्हा दाखल होवु शकला नव्हता.

crime
कपाशीला यंदा ६५०० चा भाव शक्य:७० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षीत


जिल्‍हा सामान्यरुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉय म्हणुन काम करणारा अर्जुन रेाहिदास राठोड (वय-२२रा.पंचमुखी हनुमान मंदिरा जवळ ढाके वाडी) या तरुणाने दिलेल्या माहिती नुसार, तो, कामानिमीत्त शहरातील रायसेानी नगरातून महाबळ कॉलनीकडे जात होता. एका मेडीकल समोर थांबला असतांना सोनु आढाळे (रा.समतानगर) याने काहीएक कारण नसतांना त्याच्या अंगावर धावुन जात तूच माझ्या ट्रॅक्टर वरील चालकास पळवून लावले आहे, माझे त्याच्याकडे सात हजार रुपये घेणे असुन मारहाण करण्यास सुरवात केली. सोनु आढळे याने कंबरेतून पिस्तुल काढून अर्जुन राठोड याला लावून त्याच्या टोळीला बोलावुन घेतले. त्याच्या तावडीतून सुटल्यावर आपण पोलिस ठाण्यात पळतच पोचल्याचे अर्जुन याने सांगीतले. घटना घडल्यानंतर स्थानिक नगरसेवकाकडून या प्रकरणात मध्यस्थी सुरु होती.

crime
गणरायाला निरोप देण्यासाठी मेहरुण तलाव सज्ज


वाळूचा जोर..
मारहाण करणारा सोनू आढळे आणि तक्रारदार तरुण दोघेही पेालिस कुटूंबातील असून आढळे याचे वडील पोलिस खात्यात होते.तर अर्जुन राठोड याची बहिण महिला पेालिस म्हणुन कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. आढाळे याच्यावर यापुर्वी दाखल तक्रारींची माहिती पोलिस घेत असून त्याच्या वाळूच्या ट्रॅक्टरवरील चालक मंगल मोरे याला जास्तीचे पैसे देवुन अर्जुन राठोड याने पळवुन नेल्याचे आढाळे याने चौकशीत सांगीतले.

crime
कच्छमधील या सुंदर ठिकाणांना आवश्य भेट द्या..

चौकशी सुरु आहे..
तक्रारदार तरुणाला चापट मारली आहे, पिस्तुल लावल्याचा काही प्रकार अजुनतरी वाटत नाही. मात्र, तरी सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरु असुन संशयीत सेानू आढळे याला पोलिस ठाण्यात विचारपुस सुरु आहे. तक्रारीत तथ्य असल्यास गुन्हाही दाखल होईल.
- विजय शिंदे, रामानंदन पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.