खानदेश,कसमादे पट्ट्यात दुष्काळसदृश परिस्थिती-आमदार गिरीश महाजन

Jalgaon Drought News : अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आदी ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला.
MLA Girish Mahajan
MLA Girish Mahajan
Updated on
Summary

आधीच दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता पावसाअभावी तिबार पेरणीची वेळ येऊन ठेपली आहे.

जामनेर : जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात राज्य शासनाने (State Government) कृत्रिम पाऊस (Artificial rain)पाडण्याची मोहीम हाती घेऊन उपाययोजना कराव्यात आदी मागण्या माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले.

MLA Girish Mahajan
दायमा अनेकदा संतापले..आणि कानफटातही मारली-मंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात जुलैअखेर केवळ ५० टक्केच पाऊस झाला, तर अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आदी ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. आधीच दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता पावसाअभावी तिबार पेरणीची वेळ येऊन ठेपली आहे. नंदुरबार जिल्ह्यात ३५ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला.

MLA Girish Mahajan
अ‍ॅड.पाटील हे जेष्ठ संचालक त्यांचा राजीनामा नामंजूर-रोहिणी खडसे

कृत्रिम पाऊस पाडावा..

अक्कलकुवा-धडगाव तालुक्यात परिस्थिती अत्यंत खराब आहे. नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यातही परिस्थिती दयनीयच असून, पिके मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यासाठी परिसरात तत्काळ कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रक्रिया राबवावी, पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या ठिकाणांचा शोध घ्यावा, परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दुष्काळ जाहीर करावा, शिवाय अशा सर्व भागांमध्ये तलाठी, संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षण करून तत्काळ दिलासा द्यावा आदी मागण्या माजी मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.