चार वर्षापुर्वी केला घराचा त्याग..आणि गावोगावी समाजासाठी भटकंती

पुणे येथील घर सोडून समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर पडून प्रत्येक राज्यात भटकंती करीत असून या समाज जोडो अभियान जागृती करत आहे.
Dr. Sanjay Kadam
Dr. Sanjay Kadam
Updated on
Summary

समाजातील एका मध्यप्रदेश मधील सदस्यांनी दिलेल्या दुचाकी वाहनाने मिळेल ते खाऊन जागा भेटल तेथे झोपुन ते आपली भटकंती करीत आहेत.


वाकोद (ता जामनेर) : संपूर्ण भारतातील जोशी भटक्या समाजाच्या (Joshi Nomadic Society) सर्वेक्षणासाठी (Survey) तसेच् 2017 पासून आपल्या घराचा त्याग करुण पुढील आयुष्य समाजासाठी देणारा अवलिया डॉ. संजय कदम (Dr. Sanjay Kadam) यांनी पुणे येथील घर सोडून समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर पडून प्रत्येक राज्यात भटकंती करीत असून या समाज जोड़ो अभियानान्तर्गत डॉ. कदम हे जामनेर तालुका दौऱ्यावर होते.

Dr. Sanjay Kadam
केंद्राने नव्हे थेट..युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल


यादरम्यान त्यांनी कुंभारी बू वाकोद जांभोळ वाकडि चिंचखेड़ा शेंगोला गारखेड़ा मुंदखेड़ा जामनेर अशा समाजाच्या प्रत्येक गावात भेट देऊन तेथील समाजाच्या परिस्थितिची माहिती घेत गावोगाव फिरत आहे. गावातील समस्त जोशी, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, बागडी, खिवारी भाषिक समाज, नाथपंथी, नाथजोगी, भटक्या विमुक्त जा.ज समाजाची प्रमुख मांग आहेत NT(B) चे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे NT(B) चे आरक्षण वाढले पाहिजे, NT(B) ला शासकिय नौकऱ्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीचे जास्त जागा सुटले पाहिजे, सर्व समाज बांधवांना भटके विमुक्त सर्टिफिकेट देऊन हे भटके विमुक्त आहेत आणि ह्यांचे हेच सर्वात मोठे पुरावे समजुन कोणतेच कागदपत्रे मागु नये, जात प्रमाणपत्रची अट कमी व्हावी, राजकिय आरक्षण भेटावे, अॅट्रॉसिटी संरक्षण सारखा संरक्षण कायदा भेटावा, जातीय जनगणना त्वरीत करावे, लोक कलावंतांना मानधन दयावे व लोककलावंतांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म देऊन बॉलीवुन मध्ये फिल्म इंडस्ट्री मध्ये ५% स्थान लोककलावंतांना द्यावे, बजेट मध्ये जास्त स्थान भेटावे, सर्व योजनांचे १००% विनाअट अंमलबजावणी व्हावी, राष्ट्रीय विमुक्त घुमंन्तु अर्ध घुमंन्तु कल्याण बोर्ड साठी बजेट मध्ये भरीव तरतुद करावी,अशा मागण्या समोर ठेऊन ते काम करत आहेत सर्व एकत्रित अहवाल पंतप्रधान प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यांना देणार आहेत.

Dr. Sanjay Kadam
राज्यातील आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या कपातीचा हिशेब अंधातरी

गावा गावात भटकंती..
समाजातील एका मध्यप्रदेश मधील सदस्यांनी दिलेल्या दुचाकी वाहनाने मिळेल ते खाऊन जागा भेटल तेथे झोपुन ते आपली भटकंती करीत आहेत. प्रत्येक गावात जाऊन तेथील जेष्ठ तसेच् युवक यांच्याशी संवाद साधत आहेत स्वतः डॉक्टरेट पदवी मिळून देखील कुठलीही नोकरी नाकारुण समाजासाठी समाज जोड़ो अभियान राबवित आहे समाज बांधव देखील त्यांना भरभरुन प्रतिसाद देत आहे जामनेर तालुका दौरा आटोपुन डॉ कदम हे बुलढाणा जिल्ह्यात रवाना झाले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.