उसतोड मजुरांकडून मुकादमाची साडेचार लाखांची फसवणूक

यापूर्वीही काही प्रमाणात अशाच घटनाकडून ऊसतोड मजूर पुरविण्याच्या मोबदल्यात ऊस उत्पादक शेतकरी तसेच मुकादम आमची फसवणूक झाली होती.
Fraud
Fraud
Updated on


पहूर (ता. जामनेर) : हिवरखेडे तवा (ता. जामनेर) येथील ऊसतोड मजुरांनी (Sugarcane laborer) सातारा जिल्ह्यातील कराड येथील ऊसतोड मुकादमाची ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा (Police Case) दाखल करण्यात आला आहे.

Fraud
गणरायाला निरोप देण्यासाठी मेहरुण तलाव सज्ज


जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हिवरखेडे तवा येथील रमेश नरसिंग गोसावी याने ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी नितीन निवासराव पाटील (रा. गोंधी, ता. कराड, जि. सातारा) या ऊसतोड मुकादमाकडून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये घेतले. मात्र, त्या मोबदल्यात ऊसतोड मजूर पुरविले नाहीत. याबाबत मुकादमाने वेळोवेळी रमेश नरसिंग गोसावी याच्याशी बोलण करून देखील त्याने ऊसतोड मजूर पुरवले नाहीत. तसेच दिलेल्या पैशांची मागणी केली असता पैसेही परत केले नाही, उलटपक्षी मुकादमास शिवीगाळ करण्यात आल्याची फिर्याद पहूर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.


यापूर्वीही काही प्रमाणात अशाच घटनाकडून ऊसतोड मजूर पुरविण्याच्या मोबदल्यात ऊस उत्पादक शेतकरी तसेच मुकादम आमची फसवणूक झाली होती. दरम्यान, तत्कालिन पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी संबंधित मजुरांचे समुपदेशन करून संबंधितांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले होते. त्यांच्या या कार्याबद्दल पोलिस आयुक्तांसह गृहमंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केले होते. तथापि पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती घडल्याने पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र देशमुख पुढील तपास करीत आहेत.

Fraud
कच्छमधील या सुंदर ठिकाणांना आवश्य भेट द्या..


ऊसतोड मजूर मिळविण्यासाठी दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मुकादम तसेच ऊस उत्पादक शेतकरी जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात येत असतात. स्थानिक गावात पुरेसा रोजगार नसल्यामुळे मजूर सुद्धा मोठ्या संख्येने ऊस तोडणीच्या कामी आपले बिढार हलवितात. ऊसतोडणीसाठी जाताना अनेक पालक आपल्या शाळा शिकणाऱ्या मुलांनाही सोबत घेऊन जातात. परिणामी, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अशावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गावातच रोजगाराची साधने उपलब्ध करून दिल्यास मजुरांचे स्थलांतर होणार नाही. फसवणुकीचे प्रकार थांबतील आणि विद्यार्थ्यांचेही शिक्षण होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.