तपासणीच्या नावाने आले आणि व्यापाऱ्याला लुटून गेले !

हातचालखी करत रुमालातून सोन्याची पाच ते सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली.
तपासणीच्या नावाने आले आणि व्यापाऱ्याला लुटून गेले !
Updated on

कजगाव : ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील व्यापारी (Merchant) किराणा माल (Groceries) घेण्यासाठी जात असतांना या व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची (Robbery) घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर आज गुरुवारी सकाळी घडली एकच दिवसापूर्वी चक्क तीन घर फोडत चार ते पाच लाखाच्या चोरीस काहि तास उलटत नाहि तोच दिवसा ढवळ्या व्यापाऱ्यास लुटल्या मुळे मोठी घबराट पसरली असुन चोरट्यांनी पोलिसांना (bhadgao police) आव्हानच दिले आहे.

(Merchant Groceries Shopping robers robbery)

तपासणीच्या नावाने आले आणि व्यापाऱ्याला लुटून गेले !
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थचक्रावरच घाला !

येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी ता. भडगाव येथील किराणा व्यापारी रमेशचंद धाडीवाल हे नेहमी प्रमाणे सकाळी 9 वाजता आपल्या किराणा दुकानास लागणारा किराणा माल खरेदीसाठी आपल्या दुचाकी ने कजगाव जात असताना कजगाव चाळीसगाव मार्गावर कजगाव पासुन अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांच्या मागावून दुचाकी वर आलेल्या दोन भामट्यांनी या व्यापाऱ्यास थांबवले. आणि पुढे कोरोना आहे, पुढे पोलिसांची चेकिंग सुरू आहे असे सांगत व्यापाऱ्यांच्या डोक्याचा रुमाल काढयला लावत खिशातील पैशे, सोन्याची अंगठी, घड्याल रुमालात बांधालया लावले. यावेळीच हातचालखी करत रुमालातून सोन्याची पाच ते सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली. करत निघून गेले.

तपासणीच्या नावाने आले आणि व्यापाऱ्याला लुटून गेले !
कोरोना इफेक्ट..यंदाही संत सखाराम महाराज यात्रोत्सव "लॉक डाऊन"च !

थोड्या अंतरावर आले आणि धक्का बसला..

रमेशचंद धाडीवाल हे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपावर आले. आणि थैलीत रुमाल टाकला आहे कींवा नाहि त्यात सारे पैसे घड्याळ व सोन्याची अंगठी सहीसलामत आहे कींवा काय या साठी थैली मधुन रुमाल काढला. पैसे व घड्याळ मिळाले मात्र त्यातुन अंगठी गायब झाल्याचे लक्षात आले आणि धक्काच बसला. त्वरीत धाडीवल यांनी लहान बंधु पवनकुमार धाडीवाल व पुत्र नितीन धाडीवाल यांला फोन लावून माहिती सांगितली. याा घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला माहिती सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.