मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली ते उचंदे परिसराला वादळी (storm) वाऱ्यासह झालेल्या पावसाने (Have Rain) मोठ्या प्रमाणात केळीचे व घरांचे नुकसान झाले असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) व अधिकाऱ्यांसह शेमळदे उचंदा, मेंढोळदे, नायगाव या गावांना भेटी देत तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देत विमा कंपन्यांना (Crop insurance) देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले, एवढेच नव्हे तर मेंडोळदे गावातील जवळपास १८० घरांचे नुकसान झाल्याने अन्नधान्य नसल्याने प्रांताधिकाऱ्यांना तत्काळ ग्रामस्थांना विनाअट स्वस्त धान्य पुरवण्याची ही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
(minister gulabrao patil inspected the area damaged by the storm)
पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी (ता. २९) सायंकाळी चारला शेमळदे या गावापासून पाहणी दौऱ्याला सुरवात केली. शेंमलादे आणि उचंडा येथील शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी मेंडोळदे गावातजाऊन ग्रामस्थांची विचारपूस केली. पालकमंत्र्यांनी पुनर्वसन विभागाच्या मंत्र्यांची येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना करत पुनर्वसन करण्यासंदर्भातील कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांना धान्यपुरवठा करण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना दिले.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, पुनर्वसन विभागाच्या शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्नदान सुरू केले असून पालकमंत्र्यांनी या संदर्भात आमदारांचे कौतुक केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.