अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार !

तरुणांची व्यसनाधिन संख्या वाढली असून लहान वयोगटातील मुलांना ही त्याचे व्यसन लागले आहे.
अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार !
Updated on


निंभोरा ः निभोरा बु . (ता.रावेर) येथील महिला (Womens) एकवटून अवैध (गावठी) दारू (Illegal alcohol) विक्री बंद करण्यासाठी एल्गार पुकारला आहे. याबाबत सर्व महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायतीकडे (Gram Panchayat) मोर्चा नेत निवेदनाद्वारे गावात अवैध दारू विक्री त्वरीत थांबवावी असे साकडे महिलांनी ग्रामपंचायतीला घातले आहे.

(nimbhora villege womans unity movement illegal alcoho)

अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार !
राज्‍य सरकारने वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या : खासदार खडसे

निंभोरा गावातील कोळीवाडा भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू(पन्नी) विक्री होते. लहान-मोठे तसेच सर्वच वयोगटातील व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून त्यामुळे मृत्यू दर ही वाढला आहे. विशेष म्हणजे कमी वयात १७ ते ३० या वयोगटातील तरुणांची व्यसनाधिन संख्या वाढली असून लहान वयोगटातील मुलांना ही त्याचे व्यसन लागले आहे. गावातील प्रथम नागरिक सरपंच सचिन महाले हे कोळीवाडा येथील स्थानिक असून त्यांनी या विषयाकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा महिला वर्गातून होत आहे.

सात हजार लोकसंख्या असलेल्या निंभोरा बु:गावात कोळीवाडा भाग सुमारे ४०० लोकवस्तीचा आहे येथील काही घरांमध्ये अवैध (पन्नी) दारू विक्री चालते याचा फटका संपूर्ण गावाला बसला असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरज आहे. या पूर्वीही या विषयी काही सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. मात्र या दारू विक्रेत्यांचे राजकीय व आर्थिक हितसंबंध या गोष्टीला अडथळा ठरत आहे असे बोलले जाते.

कारवाईत सातत्य हवे
मागील दीड महिन्यापूर्वी निंभोरा पोलिसांनी अवैध दारू व धंद्यांवर निंभोरा सह परिसरात वाश आऊट मोहीम राबवून गुन्हे दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या अशीच कारवाई यापुढेही कायम ठेवने आवश्यक आहे अशी भावना महिला वर्गातून व्यक्त होत आहे

अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार !
छत्र हरपले अन्‌ पोटाचा प्रश्‍न, शिक्षणाची उमेदच गमावली

सरपंचांनी संपूर्ण गावात दारूबंदी करून युवकांना व्यसनाधीन ते पासून वाचवावे असे न झाल्यास पुढील पिढी माफ करणार नाही
- महेंद्र संतोष कोळी, नागरिक.

निंभोरा सह परिसरातील अवैध दारू विक्री थांबवावी अन्यथा उपोषण करण्यात येईल दारू बंदी ला मनसेचा पूर्ण पाठिंबा आहे
स्वप्निल चौधरी/जावळे, तालुका उपाध्यक्ष, मनसे रावेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.