पाचोरा : येथे गेल्या पाच वर्षांपुर्वी बांधकाम करतांना काही तांत्रिक दोष राहील्याने बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत (Building) सोमवारी रात्री कोसळली. घडलेल्या घटनेत सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
पाचोरा शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणुन तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधली होती. परंतू बांधकाम करतांना ईमारत सुरक्षेच्या तांत्रिक बाबिकडे दुर्लक्ष केले होते. पावसामुळे या इमारतीच्या पावसाने तडे पडले होते म्हणून या इमारतीमध्ये राहत असलेले भाडेकरूनी ही इमारत रिकामी केली होती.
आणि अचानाक कोसळली इमारत
पाचोरा शहरात सोमवारी सायंकाळ पासून रिमझिम पाऊस सुरू होता. त्यात रात्री १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषद ने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. इमारत कोसळली चा व्हिडिओ सोशल मीडिया वर जोरात व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.