पाचोरा: येथील ८४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने (Old farmers) कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसताना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर (Satbara Utara) दोन लाख रुपये कर्जाची नोंद करून व नंतर ती नोंद काढून उताऱ्यावरील शेतातील विहीर (Well) व वीजपंपाची नोंद गायब करण्याचा अफलातून प्रताप येथील महसूल विभागाने (Revenue Department) केला असून, वृद्ध शेतकऱ्याने याबाबत माहिती अधिकारात माहिती मागीतली, तरीदेखील त्यांना माहिती न देऊन त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याची व्यथा नारायण जगताप या शेतकऱ्याने मांडली आहे.
(pachora old farmer satbara utara lone record by revenue department)
पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीत राहणाऱ्या नारायण जगताप (वय ८४) यांची सारोळा बुद्रुक (ता. पाचोरा) शिवारात गट क्रमांक ९७ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सारोळा बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचा दोन लाख रुपये कर्जाचा बोजा असल्याची नोंद तलाठ्याकडून करण्यात आली. त्याबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ही नोंद व बोजा कोणी बसवला? कोणत्या बँकेचे कर्ज, कोणत्या तारखेचा घेतले? याबाबतच्या कागदपत्रांची मागणी जगताप यांनी जून २०२० मध्ये तहसीलदारांकडे केली. परंतु त्याबाबत कोणताही खुलासा आजपर्यंत करण्यात आलेला नाही. सातबारा उताऱ्यावरील दोन लाख रुपये कर्जाचा बोजा कमी करा, असा कोणताही अर्ज श्री. जगताप यांनी दिलेला नाही. परंतु जानेवारी २०२१ मध्ये सदरचा कर्जाचा बोजा कमी करण्यात आला व सातबारा उताऱ्यावरून शेतातील विहीर व त्यावरील वीजपंप याबाबतची नोंद गायब केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मनस्ताप वाढला असून, त्यांनी याबाबत माहिती अधिकाराद्वारे तहसीलदार व सारोळा बुद्रुकचे तलाठी यांना माहिती अधिकारात अर्ज देऊन सातबारा उताऱ्यावरील दोन लाख रुपये कर्जाचा बोजा कमी कसा झाला? सदरची रक्कम कोणी, कोणत्या बँकेत भरली? तसेच सातबारा उताऱ्यावरील शेतातील विहीर व त्यावरील वीजपंप याबाबतची नोंद कोणी व का रद्द केली? याबाबतची माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा अर्जही घेण्यात येत नसल्याची व्यथा जगताप यांनी मांडली आहे.
आंदोलनाचा इशारा
महसूल विभागाच्या या अफलातून प्रतापामुळे मानसिक छळ व मनस्ताप वाढला आहे. याबाबत योग्य ती चौकशी कार्यवाही होऊन न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा श्री. जगताप यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.