महाजनाकडे जलसंपदामंत्री असतांना काय बोंब पाडली-गुलाबराव पाटील

इंधन दरवाढीवर न बोलणाऱ्या भाजपवाल्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patil
Updated on


पाचोरा : सध्या सुशिक्षित बेरोजगार राजकारणी वाढत असून, त्यांना कोणताही उद्योग दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) टीका करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. भाजप (BJP) म्हणजे अफवा फैलविणारे खाते आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय दिले, असे म्हणणाऱ्या खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांचे डोळे फुटले आहेत काय? जबाबदार खासदारांना हे शोभेसे नाही. आपण दोन वर्षांत काय काम केले, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) गेल्यावेळी जलसंपदामंत्री असताना, त्यांनी काय बोंब पाडली? इंधन दरवाढीवर न बोलणाऱ्या भाजपवाल्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी येथे आमदार किशोर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केली.

Minister Gulabrao Patil
जळगावः वहनोत्सवाला परवानगी, रथोत्सवासाठी प्रतीक्षा

अध्यक्षपदावरून ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, की विरोधक टीका करतात, त्यांना उत्तर देण्याइतपत त्यांची लायकी नाही. आम्ही कामामुळेच सत्तेत आहोत, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. माजी मंत्री व जबाबदार खासदार काहीही बोलतात. जनतेची दिशाभूल करतात. जनता इतकी खुळी नाही. भाजपने अफवा खाते बंद करावे आणि लोकांच्या कामाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना आम्ही काय दिले याचा पुरेपूर हिशोब देतो. समोर या, आपली काय बोंब पडली ते ही सांगा, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

विकास पॅटर्न राज्यात महत्त्वपूर्ण ठरेल..

आमदार किशोर पाटील अत्यंत भावूक होऊन दहा वर्षांत केलेल्या व दृष्टीपथात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा पाढा वाचला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे येथे आल्यानंतर त्यांच्यासमोर रस्त्यांची व्यथा मांडली असता, त्यांनी ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. १७ कोटी रुपये खर्चाच्या तीन पुलांची कामे सुरू आहेत. शहरातील विविध मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी निधी मिळाला असून, मोकळ्या जागांचा विकास पॅटर्न राज्यात महत्त्वपूर्ण ठरेल. शंभर टक्के मोकळ्या जागांचा विकास येत्या काळात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Minister Gulabrao Patil
जळगावःयावलला बायोडिझेल पंपावर ‘आयजीं’च्या पथकाचा छापा

भाजपने नैतिकता शिकवू नये..

भाजपने आम्हाला नैतिकता शिकवू नये, असे सांगून दोन टर्मला आपण मला वाढदिवशी पालिकेची सत्ता गिफ्ट केली. या वेळीही वाढदिवसानिमित्त मी पालिकेची सत्ता आपणाकडे गिफ्ट म्हणून मागत आहे, असे भावनिक त्यांनी आवाहन केले. त्यास उपस्थितांनी घोषणाबाजी करत व टाळ्यांची दाद दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भलामोठा हार व शाल देऊन आमदार पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. रमेश बाफना यांनी प्रास्ताविकात आमदार पाटील यांनी दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. गणेश पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.