महाड पुरग्रस्तांना खानदेशी तरुणांईने दिला मदतीचा हात

Mahad Flood Help : जैन नवयुवक मंडळाला महाड येथील तहसिलदार सुरेश कशिक यांचे मदतीने सेवाकार्यास सुरुवात केली.
Mahad Flood Help camp
Mahad Flood Help camp
Updated on
Summary

महाड पुरगस्तांना मदतीसाठी 25 जुलै रोजी 2 आयशर व 2 कार यात जीवनावश्यक वस्तु व बँल्केट घेवुन तब्बल 40 जणांची टिम मदत कार्यासाठी रवाना झाली.

पारोळा ः महाड शहरातील (Mahad City Flood) सावित्री नदीने पाण्याची धोक्याची पातळी ओलांडल्याने ता,22 जुलै रोजी पुरस्थिती निर्माण झाली.होत्याचे नव्हत झाले. सारा परिसर चिखलमय झाला. पाणी व घराची जागा याशिवाय तेथील लोकांच्या हाती काहीच शिल्लक नाही. शासनाच्या पाणी व बिस्कीट वर गुजरान करणाऱ्या महाडवासीयांची सामाजिक बांधिलकीतुन मदत (Help) करावी या भावनेतुन पारोळा येथील उमेश चोरडीया, दिपक भंडारी, हरीष बोरा व त्यांचे जैन नवयुवक मंडळाने (Jain Youth Mandal Parola) निर्णय घेतला. आणि तब्बल सहा दिवस प्रशासनासह परिसरातील लोकांना अन्नदानाची सेवा देवुन मदतीचा हातभार लावण्याचे कार्य त्यांनी केले.

Mahad Flood Help camp
खानदेशची केळी आता राज भवनात

कोकण व सांगली परिसरात पुरस्थिती निर्माण झाल्याने पशुसह माणसे, संसारोयोगी साहीत्य पाण्याखाली गेले. ही घटना मन हेलावणारी होती हे वृत्त जैन नवयुवक मंडळाचे उमेश चोरडीया यांनी वाचले. आपण देखील या भागात सेवा द्यावी या भावनेतुन त्यांनी इतर सदस्यांची बैठक घेवुन कोरोना काळातील अन्नदानाची सेवेचा अनुभव पाहता पुरस्थिती भागात आपण अन्नदान सेवा करावी या भावनेतुन एकमुखी होकार झाला. यावेळी जैन नवयुवक मंडळाने प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे व शहर तलाठी निशिकांत पाटील यांची मदत घेवुन पुरग्रस्त भागात सेवा करण्याचे नियोजन केले. ,25 जुलै रोजी 2 आयशर व 2 कार यात जीवनावश्यक वस्तु व बँल्केट घेवुन तब्बल 40 जणांची टिम मदत कार्यासाठी रवाना झाली.

महाड येथे केली सहा दिवस अन्नदान सेवा

जैन नवयुवक मंडळाला महाड येथील तहसिलदार सुरेश कशिक यांचे मदतीने सेवाकार्यास सुरुवात केली. यावेळी सकाळी नाश्ता, दुपारी व रात्री जेवण असा दिनक्रम ठरविण्यात आल्याने जैन नवयुवक मंडळाने शासकिय कर्मचारी, गावातील वस्तीत व परिसरात अन्नदान सेवा बजावली. चिखल व दुर्गंधी परिसरात लोकांचे जीवन जगणे मुश्कील झाल्याची स्थिती महाड गावी आहे. पुरस्थिती निर्माण झालेपासुन तेथील लोकांना जेवणाचे हाल असतांना पारोळ्यातील मंडळाने गरमागरम जेवणाची सेवा पुरविल्याने तेथील प्रशासनाने मंडळाचे कौतुक करुन अजुनकाही दिवस सेवा द्यावी असा आग्रह धरला.

Mahad Flood Help camp
आता मका,ज्वारीच्या मोजणीत वशिलेबाजी; शेतकी संघाचा गजब कारभार!

जेवण घेण्यासाठी इचभर पातेले ही नव्हते

वस्ती परिसरात अन्नदान करतांना मंडळांचे सदस्यांनी अनुभव सांगत असतांना एका महीलेकडे जेवण घेण्यासाठी इचभर पातेले देखील शिल्लक नव्हते.अन्न जवळ असतांना ते कश्यात घेवु अशी उत्कंठावर्धक परिस्थिति तेथे निर्माण झाल्याने अनेकांना गहीवरुन आले तर महीले अश्रु गाळत मंडळाच्या दर्यादिलाचे कौतुक केले.

Mahad Flood Help camp
जगातील सर्वात मोठ्या 10 रेल्वे नेटवर्क सेवा? कोणत्या घ्या जाणून

पालकमंत्री यांनी घेतला अन्नसेवेचा लाभ

यावेळी महाड परिसरात तब्बल 18 तास जैन नवयुवक मंडळ अन्नदानाची सेवा देत होते. हे लक्षात आल्यावर पालकमंत्री आदीती तटकरे यांनी घटनास्थळी जावुन अन्नसेवेचा लाभ घेत तरुणाईचा सामाजिक बांधिलकेचे कौतुक केले. यावेळी आमदार रोहीत पवार,पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे,गटनेता भारतीय काँग्रेस स्नेहल जगताप, उपविभागीय अधिकारी प्रतिमा शेगुलवार यांनी जैन नवयुवक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()