निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा-डॉ. सतीश पाटील

आगामी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार
Dr. Satish Patil
Dr. Satish Patil
Updated on

पारोळा : पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेहमीच पक्षात कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून पक्ष संघटन वाढविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण मतदार संघात (Constituency)कार्यकर्त्यांशी जीवाभावाचे नाते जोपासले आहे. जिथे शक्य आहे, तिथे प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी याला न्याय देण्याची आपली भूमिका असून, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आगामी निवडणुका (Election) डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे, अशा सूचनावजा आवाहन माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांनी केले.

Dr. Satish Patil
जळगावः परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ..!


वेल्हाणे खुर्द (ता. पारोळा) येथे स्मशानभूमीचा रस्ता व तेथील बैठक व्यवस्था २५ -१५ अंतर्गत निधीतून कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, युवक अध्यक्ष योगेश रोकडे, उपसरपंच अनिल पवार, शिवाजी पाटील, ग्रामसेवक सुनील पाटील, नंदू माळी, बाळू पाटील, चोरवड सरपंच राकेश पाटील, प्रवीण पाटील (सरपंच सांगवी), गोपाल पाटील (सरपंच सावळखेडा), बंडू मोरे (सरपंच, करमाड खुर्द), जिभू पाटील (सदस्य, करमाड), तसेच परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंचासह वेल्हाणे गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Dr. Satish Patil
जळगावः ‘मिशन कवचकुंडल’ कोविड लसीकरणाला अल्प प्रतिसाद


या वेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले, की गेल्या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध केली. नगरपालिकेत ‘शविआ’सोबत आघाडी केली, ती आमची चूक झाली. यामुळे कार्यकर्तेही नाराज झालेत. ही चूक आता दुरुस्त करीत आगामी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा, असा संदेश देत सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकत्रितपणे येऊन पक्ष संघटनासाठी कार्य करा. प्रत्येक कार्यकर्त्याला जिथे -जिथे शक्य आहे. तेथे न्याय देण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास देखील कार्यकर्त्याच्या मध्ये त्यांनी निर्माण केला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()