आता मका,ज्वारीच्या मोजणीत वशिलेबाजी; शेतकी संघाचा गजब कारभार!

Jalgaon Farmer News : पारोळा शेतकी संघात वशिलेबाजीचा कहर सुरु असुन शेतकऱ्यांचे उतारे व माल दलालांचा असे गौडबंगाल सुरु आहे.
sorghum
sorghum
Updated on
Summary

पारोळा तालुक्यात नुकतेच पारोळा व शेवगे प्र ब येथे भरड धान्य केंद्र सुरु झाले. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर सर्रासपणे खुलेआम मोजणी केली जात आहे.

पारोळा : मागील वर्षी कापुस (Cotton) व मका (Maize) मोजणीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची (Farmer) लुट झाली. तेव्हा रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांना न्याय दिला होता. आता पुन्हा ज्वारी (sorghum) मोजणीत इतर राज्याच्या माल आणुन तो केंद्रावर विकला जात आहे. हा शेतकी संघाचा (Farmers Association) गजब कारभाराच्या व्यथा शेतकऱ्यांनी माजी मंत्री डॉ. सतीष पाटील (Former Minister Dr. Satish Patil) यांच्याकडे मांडल्या असता डॉ. पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी ( Jalgaon Collector) यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधत याबाबत तक्रार केली. याची चौकशी न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी दिला आहे.

sorghum
जगातील सर्वात मोठ्या 10 रेल्वे नेटवर्क सेवा? कोणत्या घ्या जाणून

पारोळा तालुक्यात नुकतेच पारोळा व शेवगे प्र ब येथे भरड धान्य केंद्र सुरु झाले. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर सर्रासपणे खुलेआम मोजणी केली जात आहे. तसेच ट्रकच्या ट्रक ज्वारी कुणाच्या आशिर्वादाने खाली केली जात आहे. याची चौकशीची मागणी डॉ. सतीष पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

शेतकी संघाची वशिलेबाजी

शेतकी संघात वशिलेबाजीचा कहर सुरु असुन शेतकऱ्यांचे उतारे व माल दलालांचा असे गौडबंगाल सुरु आहे. याबाबत पुरावेनिशी तसेच ट्रक खाली केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला असुन याबाबत शेतकऱ्यांना घेऊन ता,4 आॅगस्ट रोजी रस्त्यावर उतरुन जनआंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी दिला आहे.

sorghum
फडणवीसांनी कर्जमाफीसाठी महाविकास आघाडीचे अभिनंदन करावे- पाटील

गव्हापेक्षा ज्वारीला भाव आणि दलालांचा सुळसुळाट

यावर्षी शासनाने ज्वारीचा प्रतिक्विंटल 2590 असा भाव जाहीर केला आहे. साधारणपणे बाजार चांगले प्रतिचे गहु 2200 ते 2300 रुपयास मिळत आहे. ज्वारीस चांगला भाव मिळत असल्याचे पाहुन दलाल मंडळी बाहेर गावाहुन ज्वारी विकत घेवुन ते पारोळा व शेवगे प्र ब केंद्रावर विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 135800 क्विंटल ज्वारीचे उद्दीष्ट होते. गेल्या तीन दिवसापासुन नोंदणी केलेले शेतकरी बाजुला करून इतरांची ज्वारी मोजली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी डॉ. पाटील यांचेकडे केली असता याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधुन या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्याप्रमाणे मॅसेज सोडुन शेतकऱ्यांचे माल खरेदी केंद्रावर मोजला जात आहे. याबाबत कोणतीही वशिलेबाजी केली गेलेली नाही. उद्दिष्ट वाढवुन आले असताना देखील अद्यापपर्यंत 5 हजार क्विंटल ज्वारी मोजणी शिल्लक आहे. शासनाकडुन आदेश आल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना मॅसेजद्वारे कळविले जाणार आहे. केलेला आरोप चुकीच्या माहीतीवरून केला जात आहे.

-भरत पाटील, व्यवस्थापक- शेतकी संघ, पारोळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()