पंचायत राज कमेटीने पारोळा तालुक्याचा घेतला आढावा..

बैठकीस फक्त 10 लोकांनी उपस्थित राहावे असे आदेश असताना सभागृहात तब्बल 28 मान्यवरांची उपस्थिती होती.
Panchayat Raj Committee
Panchayat Raj Committee
Updated on

पारोळा : गेल्या महिनाभरापासून पंचायत राज कमेटी (Panchayat Raj Committee) जिल्यात दाखल होऊन पारोळा तालुक्यात विविध विभागांचा आढावा घेणार असल्याने पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व विभाग यांनी आपली माहिती अपडेट ठेवली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पंचायत राज कमिटीने भेट देऊन विविध विषयांचा आढावा घेतला दरम्यान पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकी वेळी सभापती रेखा भिल व उपसभापती अशोक पाटील यांच्यासह माध्यम प्रतिनिधींना कमिटी कडून बैठकीत उपस्थित न राहण्याचे सांगितले.

Panchayat Raj Committee
ब्रेकिंगः वाघूर धरणाचे प्रथम सर्व २० दरवाजे उघडले

सदर कमिटीमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर,आमदार सुभाष घोटे, आमदार किशोर पाटील,आ मदार किशोर दराडे, अप्पर सचिव प्रकाशचंद्र बंदले ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रकल्प संचालिका मीनल कुंटे, प्रतिदेयक पांडुरंग धुमाळे उपस्थिती होते. तर स्थानिक म्हणून गटविकास अधिकारी विजय लोंढे, सहहायक बी. डी. ओ. विजय आहिरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी बी. बी. वारूडकर, पशु वैद्यकीय बी. एस. सूर्यवंशी गट शिक्षण अधिकारी कविता सुर्वे, शालेय पोषण आहार विभागाच्या प्रीती पवार, चंद्रकांत चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सह विस्तार अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सदर बैठकीस फक्त 10 लोकांनी उपस्थित राहावे असे आदेश असताना सभागृहात तब्बल 28 मान्यवरांची उपस्थिती होती. यात कमिटी मधील काही आमदारांनी देखील मास लावलेले नव्हते .यावेळी कमिटी कडून विविध विभागाचा मागील 4 वर्षाचा प्रशासकीय आढावा घेण्यात आला.

Panchayat Raj Committee
मुस्लीम कीर्तनकार हभप शेख महाराजांचे किर्तन सेवा देतांना निधन..

निवेदन देण्याऱ्यांची गर्दी

यावेळी विविध संघटनांनी माहिती अधिकार व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गर्दी केल्याने सभागृहा बाहेर गर्दी होउन यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पोलिसांना पाचारण करून गर्दी हटवायची वेळ आली. तब्बल एक ते दीड तास आढावा बैठकी नंतर कमिटीने शेळावे बु. गावी भेट देऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसूती गृह, औषध भांडार, यासह विविध विभागांची प्रत्यक्षात तपासणी करून ओ. पी. डी. रजिस्टर, डिलेव्हरी रजिस्टर, तातडीचे रजिस्टर, तसेच स्तनदा मातांना दिलेजाणारा औषध उपचार, तसेच बाळ सदृढ साठी केली जाणारी उपायोजना व त्यावर दिला जाणारा औषध उपचार यासह प्राथमिक आरोग्यकेंद्रात दरमहिन्याला किती प्रसूती होतात याबाबत कमिटीने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, किरण पाटील यांना विचारपूस केली. यावेळी संबंधीत आरोग्य अधिकारी यांनी कमेटीस प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. दरम्यान शेळावे आरोग्य केंद्रास आपत्कालीन सेवेसाठी १०२ रुग्यवाहिका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी बी बी वारूडकर, यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसेवक कल्पना पाटील,तलाठी ज्ञानेश्वर पाठे पोलीस पाटील प्रदीप पाटील ,कोतवाल त्रंबक कोळी यांनी स्वागत करून विभाग निहाय कमिटीला माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.