रावेर ः जळगाव जिल्ह्यासाठी महत्वकांक्षी असलेल्या असलेल्या महाकाय जलपुनर्भरण योजनेचा (Mega recharge plan) (फ्लॅड कॅनॉल) (Flood Canal) अहवाल (डीपीआर) (DPR) यार करण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर या योजनेचे भूमिपुजन पंतप्रधानांच्या (Prime Minister Narendra Modi) उपस्थितीत करण्यात येईल अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी तालुक्यातील ऐनपूर येथे सकाळशी बोलताना दिली.
(mega recharge scheme prime minister soon bhumi pujan )
मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर श्री फडणवीस पहाणी दौरा करीत आहेत.त्या वेळेस सकाळने हा प्रश्न उपस्थित केला.श्री फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प सध्या राज्यातील सर्वात मोठा नियोजित प्रकल्प असून अंतिम अहवाल ( डीपीआर ) तयार करण्यात वेळ लागत आहे. मात्र एकदा अहवाल पूर्ण झाला की तातडीने निधी उपलब्ध करून घेऊन योजनेला गती मिळेल असे त्यांनी सांगितले.
राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ राजेंद्र फडके, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,पंचायत समितीच्या सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, सदस्य जीतू पाटील,तालुकाध्यक्ष राजन लासूरकर उपस्थित होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.