रावेरखेडीत थोरल्या बाजीरावांचे स्मारक!

बाजीरावांच्या सैन्याचा तळ असताना उष्माघाताने त्यांचे निधन झाले
रावेरखेडीत थोरल्या बाजीरावांचे स्मारक!
Updated on

रावेर : मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) पेशवे थोरले बाजीराव (Peshwa Thorale Bajirao) यांचे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रावेरखेडी येथे असलेले समाधीस्थळ नर्मदा नदीच्या (Narmada river) प्रकल्पातील बॅक वॉटरमध्ये गेले आहे. त्यामुळे तेथेच त्यांचे नवे भव्य व यथोचित स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी त्याचा विशेष पाठपुरावा केला आहे. (monument of thoralya bajirao at raverkhedi)

रावेरखेडीत थोरल्या बाजीरावांचे स्मारक!
जळगावात खासगी इंग्रजी, सीबीएसई शाळांची मुजोरी


छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोरले बाजीराव यांनी मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांचे समाधीस्थळ मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे आहे. मात्र, मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील एका धरण प्रकल्पांतर्गत ते समाधीस्थळ पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे तेथून काही अंतरावरच नर्मदेकिनारी थोरले बाजीराव यांचे भव्य स्मारक उभारले जावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही व्यक्त केली होती. खासदार डॉ. सहस्रबुद्धे यांनी त्या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सहस्रबुद्धे यांनी थोरले बाजीराव पेशवे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी अमित शहा यांनी या स्मारकाचे महत्त्व विशद करून लगेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी या प्रकल्पासाठी तत्काळ मंजुरी दिली.

वीस वर्षांपासून प्रतीक्षा
गेल्या २० वर्षांत बाजीराव पेशवे स्मृती प्रतिष्ठानच्या विनंतीवरून या समाधीस्थळावर अनेक मान्यवर राजकारणी येऊन गेले. मात्र, आश्वासनाशिवाय काहीच हाती आले नाही. आता केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी यात लक्ष घातल्याने त्यांची घोषणा पूर्णत्वाला येईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


गेल्या २० वर्षांपासून ‘बाजीराव पेशवे स्मृती प्रतिष्ठान’ या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच हे स्वप्न साकार होईल. त्याला मूर्त रूप येईल, अशी अपेक्षा आहे. -श्रीपाद कुलकर्णी-बांगर,
संरक्षक, बाजीराव पेशवे स्मृती प्रतिष्ठान, रावेरखेडी, मध्य प्रदेश

रावेरखेडीत थोरल्या बाजीरावांचे स्मारक!
कोरोनाच्या हद्दपारीसाठी १,१५३ गावांत दक्षता समित्या


अपराजित योद्धा
थोरले बाजीराव पेशवे यांनी वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत केलेल्या २० वर्षांतील सुमारे ३५ लढायांत अपराजित योद्धा म्हणून लौकिक मिळविला आहे. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास अमेरिकेतही केला जातो. दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक देणाऱ्या या थोरल्या पेशव्यांनी गायकवाड (बडोदा), सिंधिया (ग्वाल्हेर), भोसले (नागपूर), पवार (धार) आणि होळकर (इंदूर) या मराठा सरदारांत ऐक्य निर्माण केले. म्हणून त्यांच्या निधनानंतर ग्वाल्हेरच्या सिंधिया परिवाराने त्यांचे स्मारक बांधले. मध्य प्रदेशातील बैडियाजवळील रावेरखेडी येथून वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पात्र काहीसे उथळ असल्याने सैन्यासह नदी ओलांडून तेथून उत्तर भारतात जाता येत असे. येथे बाजीरावांच्या सैन्याचा तळ असताना उष्माघाताने त्यांचे निधन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.