थरारक घटना..पाल जवळ दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

त्यांचा पाठलाग केला पण अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन ते पसार झाले
crime
crimecrime
Updated on

रावेर : शिकार (Hunting) करण्याच्या उद्देशाने किंवा दरोडा (Robbery) घालण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या दोघा मोटरसायकल स्वारांनी पकडले जाण्याच्या भीतीने पोलिसांवर गावठी बंदुकीने (Gun) गोळीबार (Firing) केल्याची खळबळजनक घटना आज (ता १२) पहाटे पाल नजीक घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात (Raver police station) अज्ञातां विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून संशयितांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. (pal villege neer robbers open fire police)

crime
कृउबातील गर्दी नियंत्रणासाठी पोलीस अधिक्षकांनी हाती घेतले सुत्र!

याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील पोलिस ठाण्याची पोलीस व्हॅन (क्र एम एच १९- एम- ०६८१) नेहमी प्रमाणे काल (ता ११) रात्री पाल येथे गस्त घालण्यासाठी गेली होती. गाडीत पोलीस कर्मचारी श्रीराम कांगणे आणि गृहरक्षक दलाचे सुनिल तडवी, कांतीलाल तायडे आणि अमित समर्थ होते. परत येताना पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी सहस्त्रलिंग गावानजीकच्या सलीम तडवी यांच्या ढाब्याजवळ हे चौघे चहा पिण्यासाठी थांबले असता रावेरकडून त्यांना दोन मोटारसायकली येताना दिसल्या. इतक्या मध्यरात्री कोण आहे हे पाहण्यासाठी पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना थांबविण्याच्या प्रयत्न केला मात्र पहिली मोटरसायकल वेगात पालकडे निघून गेली. मात्र दुसऱ्या मोटारसायकल स्वाराने पोलिसांना पाहताच मोटर सायकल थांबवली, मागील व्यक्तीने पोलिसांच्या आणि गाडीच्या दिशेने गोळीबार केला आणि तातडीने आल्या रस्त्याने मोटारसायकल निघून गेली. चौघांनी त्यांचा पाठलाग केला पण अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन ते पसार झाले.

घटनेची खबर रावेर पोलीस ठाण्यात मिळतात तपास कामी पोलीस पथक परिसरात रवाना करण्यात आले. घटनास्थळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी भेटी दिल्या पाहणी केली. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख यावेळी उपस्थित होते. घटनास्थळी श्वानपथक आणि तसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

crime
दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात तीव्र उन्हाळ्यातही केवळ एकच टँकर

अनर्थ टळला--

या दोघा अज्ञातांनी ठासणीच्या (गावठी) बंदुकीतून गोळीबार केला. त्यात दारू भरून तिचा बार उडवला जातो. जर त्यांच्याजवळील बंदूक गोळ्यांची ( काडतुस) असती तर त्यांना दुसरी गोळी झाडता आली असती आणि अनर्थ ओढवला असता अशी शक्यता व्यक्त होत आहे. पळून जाताना ही गावठी बंदूक त्यांच्या हातून खाली पडली आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या बंदुकीचा वापर करून हे चौघे शिकार करण्यासाठी आले होते की दरोडा घालण्‍यासाठी आले होते हे कळू शकले नाही. मात्र पोलिसांवर गोळीबार झाल्याने येथे एकच खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक अधिक तपास करीत आहेत.

crime
तापीचे बॅक वॉटर फुलविणार सहा हजार हेक्टरवरील शेती

गुन्हेगार मध्यप्रदेशातील

पाल पासून मध्यप्रदेशची हद्द अवघ्या ४ किलोमीटरवर आहे. तिकडे पळून जाण्यासाठी जंगलातून अनेक रस्ते आहेत. हे गुन्हेगार मध्यप्रदेशातीलच असावेत आणि तिकडेच पळून गेले असावेत अशी शक्यता आहे.

(pal villege neer robbers open fire police)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()