वादळी पावसाने आजींना केलं बेघर...

लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुराळा उडवीत वादळामुळे केळीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता आल्या
वादळी पावसाने आजींना केलं बेघर...
Updated on

रावेर ः दोनच दिवसांपूर्वी सातपुड्याच्या (Satpuda) पट्ट्यात येऊन गेलेले चक्रीवादळ (Storm) केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) उद्ध्वस्त करून गेलेच पण मूलबाळ आणि घरदार ही नसलेल्या जिजाबाई भिल या ६५ वर्षीय वृद्धेला खऱ्या अर्थाने उघड्यावर आणून गेले. त्यांची परिस्थिती ऐकून नक्कीच डोळ्यात पाणी येते पण महसूल प्रशासनाने (revenue department help) या वृद्धेला सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

(storm old lady house damage revenue department help)

वादळी पावसाने आजींना केलं बेघर...
ओबीसी असो..की मराठा आरक्षण हे विषय केंद्राच्या अखत्यारीत
Help
HelpHelp

केऱ्हाळा बुद्रुक येथे पिंप्री रस्त्यावर गावाबाहेर असलेल्या एका वस्तीत जिजाबाई मंगू भिल या वृद्धेची एक झोपडी आहे. खऱ्या अर्थाने १० फूट बाय १० फूटच्या एका खोलीत या महिलेचा संसार म्हणजे फक्त स्वयंपाकाची भांडी आणि अंगावरची वस्त्रे आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसाने या महिलेचे घराचे छप्पर उडून गेले आणि खऱ्या अर्थाने ती निराधार झाली.

वादळी पावसाने आजींना केलं बेघर...
भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडीचे ११० व्या वर्षात पदार्पण !


सुमारे दहा वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे.तिला मूलबाळ नाही. तिच्या जवळ स्वतःचे रेशन कार्ड किंवा आधार कार्डही नाही. तहसीलदार उषाराणी देवगुणे आणि आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांच्या पाहणी दौऱ्यात ही गोष्ट तेथील सामाजिक कार्यकर्ते अमोल गणेश पाटील यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. आता या महिलेसाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश त्यांनी तेथील तलाठी शैलेश झोटे यांना दिले. तसेच तिला तात्पुरत्या स्वरूपात भोजनासाठी साहित्यही देण्यात आले. उद्योजक श्रीराम पाटील यांनीही तिला जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊ केले आहे. खऱ्या अर्थाने निराधार असलेल्या या जिजाबाईला संजय गांधी निराधार योजनेतून मदतही सुरू करण्यात येणार आहे. या महिलेच्या अगदी घराजवळून अनेक लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुराळा उडवीत वादळामुळे केळीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता आल्या आणि गेल्या पण या महिलेची विदारक कथा स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलीच नाही. अखेर महसूल विभागाने तिच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.