रावेर परिसरात..प्रथमच पर्यावरण पूरक अत्यंस्कार

पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारात पार्थिव शरीराच्या दहनासाठी लाकडांचा अजिबात वापर केला जात नाही.
रावेर परिसरात..प्रथमच पर्यावरण पूरक अत्यंस्कार
Updated on

रावेर ः येथील माजी नगराध्यक्ष (कै) गणपत रामभाऊ शिंदे यांच्यावर आज पर्यावरण (Environment) पूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. शहर आणि परिसरात अशा प्रकारचे अंत्यसंस्कार (Funeral) प्रथमच करण्यात आल्याने तो उपस्थित सर्वांच्याच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झाला.

रावेर परिसरात..प्रथमच पर्यावरण पूरक अत्यंस्कार
हसत खेळत घरातून निघालेल्या युवकांच्या मृत्यूने सुळे गावावर शोककळा

(कै) गणपत शिंदे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचे पुतणे एडवोकेट लक्ष्मीकांत शिंदे यांनी एका ठिकाणी असे पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधी पाहिले होते. गणपत शिंदे यांच्या देविदास शिंदे आणि चंपालाल शिंदे या मुलांशी चर्चा करून शिंदे कुटुंबाने पर्यावरण पूरक पद्धतीने अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला आणि अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशन व अमळनेर गोशाळा यांच्याशी संपर्क साधला.

या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारात पार्थिव शरीराच्या दहनासाठी लाकडांचा अजिबात वापर केला जात नाही. त्याऐवजी गोशाळेत गायीच्या शेणापासून हा तयार झालेला गोवर्‍या, शुद्ध तूप, कापूर आणि चंदनाचा वापर केला जातो. जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्मशानात चिते भोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या, स्मशानातील फाटकापर्यंत आणि गणपत शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घराजवळ देखील रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चिता आणि परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. या प्रकारच्या अंत्यसंस्कारात डिझेल, पेट्रोल, रॉकेल आणि लाकूड यांचा वापर करण्यात येत नाही. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात किमान एका झाडाचे लाकूड वाचते असा या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो व्यक्तिंचे दहन संस्कार अशा पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

रावेर परिसरात..प्रथमच पर्यावरण पूरक अत्यंस्कार
शेतात खेळतांना अचानक भावंडे बेपत्ता..अज्ञातावर गुन्हा दाखल

श्री. शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते. रावेर शहर आणि परिसरात अशा प्रकारचा हा प्रथमच पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार झाल्याने सर्व उपस्थितांच्या तो चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.