भुसावळ : तालुक्यातील वरणगावजवळ राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) ढाब्याजवळ बायोडिझेलचा (Biodiesel) काळा बाजार (Black Market) करून ज्यादा दाराने विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० लाख ७५ हजारांचे २५ हजार लिटर बायोडिझेलसह टॅंकर जप्त करण्यात आले. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात (Varangaon Police Station) गुन्हा दाखल झाला.
जळगाव जिल्ह्यात बायोडिझेल विक्री करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने भुसावळ- मुक्ताईनगर चौपदरी रोडवरील हॉटेल गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकला. काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत असलेले दोन टँकर टाक्यांत बायोडिझेल भरलेले आढळून आले, तर उर्वरित बायोडिझेलच्या पाइनलाइनला डिस्पेन्सर मशिनद्वारे साठा करीत असताना, आढळून आले. या कारवाईत २० लाख ७५ हजारांचे २५ हजार लिटर बायोडिझेलसह २० लाख रुपयांचे टँकर आणि एक लाख २० हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ३१ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यांना केली अटक
याप्रकरणी पोलिसांनी मालक युसूफ खान नूर खान (वय ५४, रा. वरणगाव, ता. भुसावळ), कामगार आफताब अब्दुल कादर राकोटिया (२१, रा. हीना पार्क, वरणगाव) आणि टॅंकरचालक बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (४१, रा. खरगपूर, पो. मेहनगर आजमगड, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक निरीक्षक जलिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील दामोदरे, दीपक पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, चालक दर्शन ढाकणे, भारत पाटील यांनी कारवाई केली.
Remarks :
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.