कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थचक्रावरच घाला !

दळणवळणाची साधने बंद झाल्याने अर्थचक्र थांबल्यासारखी स्थिती झाली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थचक्रावरच घाला !
Updated on



वावडे (ता. अमळनेर) : कोरोनासारखे (corona Crisis) जागतिक आरोग्य संकट आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (second wave) रुग्णांची (patient) वाढती संख्या, जिल्ह्यात सुरू असलेली संचारबंदी (carfu) , तसेच परत लॉकडाउनची (Lockdown) भीती यामुळे अनेक कामगारांच्या हातातील रोजगार हिरावला गेला. मुळात गावात (villege) रोजगार (Employment) नसल्याने मोठ्या शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेले अनेक कुशल कामगार संचारबंदीमुळे मूळगावी परतले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीने अर्थकारणावर (finances stopped) मोठा परिणाम झाला आहे. (corona second wave rural economic cycle stopped)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थचक्रावरच घाला !
ऑनलाइन नोंदणीचा ताप; शहरवासीयांचे लसीकरण ग्रामीण भागात

कोरोनाचे संक्रमण ग्रामीण भागात झपाट्याने पसरले. मुख्यतः शेती व शेतीशी निगडित असणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा कोरोनाच्या काळ्या ढगांचे सावट अधिकच गडद होताना दिसत आहे. मागील वर्षी दळणवळणाची साधने बंद झाल्याने अर्थचक्र थांबल्यासारखी स्थिती झाली होती.

आठवडेबाजार ठप्प

स्थिती पुन्हा सामान्य होत असताना कोरोनाने डोके वर काढले व दुसऱ्या लाटेने पार कंबरडेच मोडले. ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा म्हणजे आठवडेबाजार. हे परिसरातील व्यवहाराचे उलाढालीचे मुख्य ठिकाणदेखील काही महिन्यांपासून बंद झाले. ग्रामीण भागातील कोरोनाच्या शिरकावाने शेतकऱ्यांसाठी हमखास उत्पन्नाचा मार्ग आठवडेबाजार पुन्हा बंद झाला. विक्रीयोग्य असलेला माल शेतकरी कवडीमोल विकत आहे. मागील काही दिवसांपासून पुन्हा लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली.

जीवनावश्यक वस्तू महागल्या

बाजार बंद असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होऊ लागले. शेतकरी भाजीपालावर्गीय पिकाकडे वळत असल्याने भाजीपाला खराब होत आहे, तर दरही माफक मिळत नाही. मागणी कमी व पुरवठा जास्त असल्याने आता खर्च वजा जाता उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. त्यात डाळी, खाद्यतेल, सिलिंडर व इतर जीवनावश्यक वस्तू महागल्याने पूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. कामाच्या ठिकाणी जावे लागल्यास एका प्रकारची अनामिक भीती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थचक्रावरच घाला !
वेळप्रसंगी स्‍मशानभूमीपर्यंत त्‍यांची भुमिका; पण कोरोना युद्धातील देवदूत उपेक्षितच


विवंचनेत शेतकरी

बाजारपेठेत आलेली मरगळ पाहता आर्थिक विवंचनेत घरगाडा कसा चालवायचा, या विवंचनेत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, गृहिणी भरडल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारणावर मोठा परिणाम दिसू लागला आहे.

( corona second wave rural economic cycle stopped)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.